loader
Breaking News
Breaking News
Foto

​सिंधुदुर्गात हत्तींची ‘फाटाफूट’; तीन कळपांचा वावर, बागायतदार धास्तावले

​सावंतवाडी (प्रतिनिधी ) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात सध्या सहा हत्तींचा वावर असून, या हत्तींमध्ये फाटाफूट होऊन त्यांचे तीन स्वतंत्र गट झाले आहेत. हे हत्ती सध्या काजू बागा आणि लोकवस्तीच्या दिशेने सरकत असल्याने शेतकरी व बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, बहुचर्चित 'ओंकार' हत्ती सध्या महाराष्ट्र-गोवा सीमेवरील कळणे-सासोली भागात असून, वन विभाग त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, सहा हत्तींच्या या समूहात आता तीन गट पडले आहेत. एका कळपात 'बाहुबली' हत्ती आणि एक मादी हत्ती आहे. दुसऱ्या गटात एक मोठी मादी आणि दोन पिल्ले असा वावर मोर्ले व घोटगे परिसरात दिसून येत आहे. तर, 'ओंकार' नावाचा हत्ती सध्या एकटाच फिरत असून तो गोवा सीमेवरील दोडामार्ग तालुक्यातील कळणे, फोंड्ये आणि सासोली परिसरात ठाण मांडून आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या काजूचा हंगाम सुरू असल्याने बागांमध्ये काजू बोंडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. हे हत्तींचे आवडते खाद्य असल्याने हत्तींचा मोर्चा काजू बागांकडे वळला आहे. तसेच फणस खाण्यासाठी हत्ती लोकवस्तीच्या जवळ येत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. या हत्तींनी भातशेती, नारळ, केळी आणि काजू पिकाचे प्रचंड नुकसान केले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. ​'ओंकार' हत्तीने गेल्या काही महिन्यांत दोडामार्ग ,सावंतवाडी आणि गोवा सीमा भागात मोठा धुमाकूळ घातला होता. त्याला जेरबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे त्याला अद्याप पकडता आलेले नाही. दोन दिवसांपूर्वी त्याने गोव्यातील हणखणे परिसरात प्रवेश केला होता, त्यानंतर तो पुन्हा नेतर्डेमार्गे कळणे-सासोली भागात परतला आहे. तो पुन्हा तिलारीच्या दिशेने जावा, यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

टाईम्स स्पेशल

​"न्यायालयाने ओंकार हत्तीला जेरबंद करण्यास सध्या नकार दिला आहे. मात्र, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या हाय पॉवर कमिटीकडे दोन वेळा अपील केले असून, त्याला पकडण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे." असे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी सांगितले. ​हत्तींच्या या त्रासामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी आणि बागायतदारांनी वेळोवेळी आंदोलने व मोर्चे काढून हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. आता वन विभागाच्या पुढील हालचालींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg