loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली सांस्कृतिक महोत्सवात पाडलेचे श्री दत्तसेवक भजन मंडळ ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी

दापोली (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दापोली सांस्कृतिक महोत्सव २०२६’ अंतर्गत पार पडलेल्या तालुकास्तरीय भजन स्पर्धेत पाडले येथील श्री दत्तसेवक भजन मंडळाने प्रथम क्रमांकावर मोहर उठवली. त्यामुळे अखंड तालुक्यात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरय्या सभागृहात पार पडलेल्या सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमातील भजन स्पर्धेत तालुक्यातील विविध भजन मंडळांनी आपला सहभाग घेतला होता. यामध्ये पारंपरिक वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जपत पाडले येथील श्री दत्तसेवक भजन मंडळाने भजन, रूपावली, गजर, अभंग आणि गवळणींचे अत्यंत भावपूर्ण सादरीकरण केले. त्यांच्या भक्तिमय गायनामुळे संपूर्ण सभागृहात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आणि उपस्थित भजन रसिकांनी प्रत्येक गाण्यांच्या सादरीकरणाला टाळ्यांच्या कडकडाटाची उत्स्फूर्त दाद दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री दत्तसेवक भजन मंडळाचे बुवा जीवन वसंत गुहागरकर यांनी आपल्या सुरेल आवाजात भजन सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध करत वाहवा मिळवली. त्यांना सुदर्शन बुरंबाडकर (पखवाज) आणि प्रथमेश आंजर्लेकर (तबला) यांनी सुरेल व तालबद्ध साथ देत सादरीकरण अधिक प्रभावी केले. गायन आणि वाद्यसंगतीचा सुंदर संगम प्रेक्षकांना विशेष भावला. यावेळी जीवन गुहागरकर बुवांनी दापोली सांस्कृतिक महोत्सवाच्या संकल्पनेवर आधारित एक विशेष गजर सादर केला. या गजरातून कोकणातील सांस्कृतिक वैभव, परंपरा आणि कलेचे महत्त्व अधोरेखित केले. या गजराने अवघे रसिक प्रेक्षक भारावून गेले. त्या गजराचे बोल पुढीलप्रमाणे होते... दापोली सांस्कृतिक महोत्सव हा रंगला कृष्णामामांच्या पुण्याईने कलेचा जागर झाला || धृ || नमन भजन खालुबाजा विविध कलेचा कोकण राजा ठेवा जपला संस्कृतीचा मराठीचा इथे गाजावाजा रंगमंच हा तुम्ही हो दिधला कलावंत धन्य झाला || १ || अशा प्रकारे एका पेक्षा एक सर्वाना रुचतील भावतील अशाप्रकारेची मन डोलवणारी भजने गात उत्कृष्टरित्या सादरीकरणाने उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आणि भजन कला प्रकाराच्या कार्यक्रमात आपली मोहर उठवली त्यामुळे दापोलीसह आपल्या गावाचे नावही रोशन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg