रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील घनकचरा प्रकल्पात कचरा जाळण्याच्या वाढत्या प्रकारामुळे परिसरात विषारी धुराचे साम्राज्य पसरले आहे. या जीवघेण्या प्रदूषणामुळे कोकण नगरसह आसपासच्या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात संतप्त रहिवाशांनी पालिकेच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. वेळीच उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. गेल्या काही दिवसांपासून साळवी स्टॉप डंपिंग ग्राउंडवर सातत्याने कचरा जाळला जात आहे.
यातून निघणारा दाट आणि दुर्गंधीयुक्त धूर स्टेट बँक कॉलनी, क्रांतीनगर, कोकण नगर आणि कीर्ती नगर परिसरात पसरत आहे. परिस्थिती इतकी भीषण आहे की, नागरिकांना श्वास घेणे कठीण झाले असून रात्रीपासून सकाळपर्यंत घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद करून राहावे लागत आहे. या धुरामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये खोकला, दम्याचे झटके, सर्दी आणि उलट्यांचे प्रमाण वाढले आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. मुख्याधिकारी वैभव गारवे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कचरा जाळण्याचे प्रकार तात्काळ थांबवून नागरिकांना या त्रासातून मुक्त करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी केवळ कचराच नव्हे, तर कोकण नगरमधील रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव या समस्यांकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी उबाठाचे नगरसेविका फौजिया मुजावर, नगरसेवक केतन शेटये, शिवसेना शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्यासह तन्वीर मुजावर, रोहन वरेकर, सुफियान जयगडकर, समरीन सावकार, मीनल सावंत आणि मेहरुन्निसा साखरकर उपस्थित होते. तसेच कोकण नगरमधील महिला व नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. जर प्रशासनाने या समस्येवर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी यावेळी दिला आहे.




















































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.