देवळे (प्रकाश चाळके) - रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर मंगळवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. दाभोळे पुलाजवळ डंपरने पाठीमागे घेताना दिलेल्या धडकेत एका दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने, दुचाकीस्वाराने वेळीच उडी मारल्याने त्याचे प्राण वाचले असून 'नशीब बलवत्तर' म्हणूनच हा मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दाभोळे गावातील रहिवासी अवधूत हरिचंद्र बेलकर हे मंगळवारी पहाटे आपल्या दुचाकीने (क्रमांक MH-08-BA-5167) कामानिमित्त जात होते. ते दाभोळे पुलाजवळ आले असता, डंपर (क्रमांक MH-08-1589) च्या चालकाने [ बेनी नवल सिह भुमिया रा. मध्य प्रदेश आपली गाडी निष्काळजीपणे आणि धोकादायक रित्या पाठीमागे (रिव्हर्स) घेतली. या डंपरने थेट दुचाकीला धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की, दुचाकी थेट डंपरच्या चाकाखाली गेली. मात्र, समोरून काळ येत असल्याचे दिसताच अवधूत बेलकर यांनी प्रसंगावधान राखून दुचाकीवरून उडी मारली. यामुळे ते या अपघातातून सुखरूप बचावले. या दुर्घटनेत दुचाकीचे मात्र पूर्णतः नुकसान झाले आहे.या प्रकरणी देवरुख पोलिसांनी संबंधित डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



















































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.