loader
Breaking News
Breaking News
Foto

गिम्हवणे दुबळेवाडी येथील श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी निमित्त राम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

दापोली (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील गिम्हवणे दुबळेवाडी येथील श्रीराम मंडळ गिम्हवणे दुबळेवाडी मुंबई ट्रस्ट आणि प्रगती महिला मंडळ गिम्हवणे दुबळेवाडीने आपल्या ऐक्याच्या जोरावर विविध प्रकारचे धार्मिक, सांस्कृतिक, क्रिडा विषयक, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध कार्यक्रमांचे श्रीराम जन्मोत्सव सोहळयानिमित्ताने आयोजन केले आहे. गिम्हवणे दुबळेवाडी येथील ग्रामस्थांनी सन १९४८ मध्ये श्रीराम जन्मोत्सवाची सुरू केलेली परंपरा ही कोराना संक्रमणाच्या प्रादुर्भावाचा काळ वगळता अंखडीतपणे आजही त्याच श्रध्दा आणि भक्ती भावनेने सुरू ठेवली आहे. यामध्ये बुधवारी २५ मार्च 20२६ रोजी सकाळी ५ ते ६ नामस्मरण, काकड आरती व अभिषेक, रात्रौ १० वाजता ह. भ. प. कर्वे बुवा यांची कीर्तनरुपी सेवा, गुरुवारी २६ मार्च २०२६ रोजी सकाळी ५ ते ६ वाजता नामस्मरण, काकड आरती व अभिषेक, सकाळी ११ ते १ वाजता ह. भ. प. कर्वे बुवा यांची कीर्तनरुपी सेवा आणि श्रीराम जन्मोत्सव सोहळा, दुपारी २ ते ९.३० वाजण्याच्या कालावधीत रथ मिरवणूक सोहळा, सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा व तीर्थप्रसाद, सायंकाळी ५ ते ७ वाजता आझादवाडी विकास मंडळ गिम्हवणे यांची भजनरुपी संगीत सेवा, रात्री १० वाजता दिलिप अर्जुन भुवड यांच्या सौजन्याने स्व. राजाराम यादव आणि शिष्टमंडळी असोंड यांच्या संगीत भजन सेवेचा कार्यक्रम तर शुक्रवारी २७ मार्च २०२६ रोजी प्रगती महिला मंडळ गिम्हवणे दुबळेवाडी आयोजित श्री सत्यनारायणाची महापूजा दुपारी १२ ते ३ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम, रात्री ८ ते ९ वाजता आरती व दिंडी कार्यक्रम, रात्री ९ ते ९.३० वाजता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg