दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते तिलारी रस्ता काम सुरू आहे यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अरूंद रस्ता, एकेरी धोकादायक मार्ग यामुळे दुचाकी वाहनांचे अपघात वाढले आहेत. या रस्त्यावर मंगळवारी साटेली-भेडशी धनगरवाडी येथे दोन दुचाकी वाहन धारकात गोंधळ उडून एकमेकांना धडक बसून यात तीन जण जखमी झाले. यातील एक जण गंभीर जखमी झाला. त्याला गोवा येथे हलविण्यात आले, मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला तर दोन जण किरकोळ जखमी झाले.
दोडामार्ग पोलीस ठाण्यात अपघात गुन्हा दाखल करणे उशिरा सुरू होते. दरम्यान अपघाताबाबत अधिक माहिती अशी गोवा येथील जॉन बावतीस डिसोझा वय वर्षे ५७ हे ऍक्टीव्हा स्कुटर जीए. ०३ ऐई ७५१४ ही घेऊन साटेली भेडशी कुडासा तिठा येथील खाजगी आयुर्वेदिक दवाखान्यात जात होते. तर साटेली भेडशी कडून पांडुरंग अनिल दळवी, व अश्विनी दळवी हे भाऊ बहिण मोटर सायकल एम. एच. ०७ वाय. ८०५३ घेऊन दोडामार्ग दिशेने कामावर जात होते. या ठिकाणी दोन्ही दुचाकींची धडक बसून तिघे खाली पडले. घटनास्थळी जमलेल्या नागरीकांनी तातडीने गाडी बोलवून दोडामार्ग रूग्णालयात दाखल केले.
या नंतर दोडामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात आणली. या अपघातात जखमी झालेले जॉन बावतीस डिसोझा यांना जास्त मार लागला. त्यामुळे तातडीने आझिलो म्हापसा येथे १०८ मधून हलविले. तेथून त्याना बांबोळी येथे हलविण्यात आले पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. तर मोटारसायकल वरील किरकोळ जखमींना उपचार करून घरी पाठवले. या अपघाताबाबत दोडामार्ग पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता उशिरापर्यंत अपघात दाखल करणे सुरू आहे, असे सांगितले.




.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.