loader
Breaking News
Breaking News
Foto

संशयित सागर कारिवडेकर यांच्या आलिशान बंगल्यावर पोलिसांनी लावली जप्तीची नोटीस

सावंतवाडी : आर्थिक गुन्ह्यांच्या तपासात मोठी उलथापालथ करत संशयित सागर कारिवडेकर यांच्या आलिशान बंगल्यावर पोलिसांनी पंचनामा करून जप्तीची नोटीस लावून ताबा घेतला आहे. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने थेट कारवाई करत संबंधित बंगल्यातील सर्व मालमत्ता गुन्ह्यातील जप्त मालमत्ता म्हणून घोषित केली. नोटीसमध्ये स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय कोणीही त्या परिसरात प्रवेश करू शकणार नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमे तसेच महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम १९९९ नुसार ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर सावंतवाडीमध्ये राजकीय व सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून “आता पुढचा नंबर कोणाचा?” असा सवाल जोर धरू लागला आहे. तपासाची साखळी लांबणार असल्याचे संकेत मिळत असून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg