loader
Breaking News
Breaking News
Foto

मुर्डी आडवी आळी येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन

दापोली (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील श्री राम मुर्डी कोंड (आडवी आळी) येथे श्रीराम नवमी उत्सवानिमित्त २५ मार्च ते २८ मार्च २०२६ दरम्यानच्या कालावधीत विविध प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक क्रीडाविषयक तसेच सामाजिक कार्यक्रमाचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम मंडळ मुर्डी कोंड (आडवी आळी) चे श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्याचे हे २६ वे वर्ष आहे. यावर्षी श्रीराम नवमी उत्सवानिमित्त २५ मार्च २०२६ रोजी सकाळी ७ वाजता पूजापाठ, सायंकाळी ७.३० वाजता आरती, रात्री १० वाजता श्री विमलेश्वर भजन मंडळ मुर्डी बुवा स्वप्निल गुरव, श्रीनिवास भिडे यांच्या भजनाचा कार्यक्रम गुरुवारी २६ मार्च रोजी सकाळी ७ वाजता पूजा पाठ, सकाळी १० वाजता ह.भ.प. तेजस जोशी यांचे कीर्तन व श्री जन्मोत्सव सोहळा कार्यक्रम पार पडणार आहे. दुपारी १ वाजता महाप्रसाद सायंकाळी ४ वाजता पालखी मिरवणूक, सायंकाळी ७.३० वाजता आरती, रात्री १० वाजता कालभैरव भजन मंडळ आंजर्लेचे मदन बुवा यांच्या भजनाचा कार्यक्रम तर २७ मार्च ते २८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता सलग दोन दिवस श्रीराम नवमी उत्सवानिमित्त अंडर आर्म बॉक्स नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg