नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे स्टोअर परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या विजयी यात्रेदरम्यान घडलेल्या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. विजयी यात्रेच्या उत्साहात शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी पराभूत भाजप उमेदवाराच्या कार्यालयाबाहेर अपमानजनक घोषणाबाजी करत बिस्किटे फेकल्याचा प्रकार समोर आले आहे. यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजयी यात्रेदरम्यान विजयी नगरसेवकाच्या मुलासह काही कार्यकर्ते थेट भाजप कार्यालयाबाहेर आले. यावेळी त्यांनी अपमानजनक घोषणा देत संतापजनक कृत्य केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी यापूर्वी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.
मात्र, पोलिसांकडून अपेक्षित कारवाई न झाल्याचा आरोप करत, आजपासून नवी मुंबई पोलीस मुख्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून विजयी नगरसेवकाचा मुलगा महेश कुलकर्णी यांच्यासह संबंधित कार्यकर्त्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.






















































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)















































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.