loader
Breaking News
Breaking News
Foto

स्व.अजितदादा पवार यांच्या अस्थी कलश दर्शनासाठी म्हसळा शहरात भाविकांची मोठी गर्दी

म्हसळा-रायगड : महाराष्ट्र राज्याचे कणखर अभ्यासू व कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार साहेब यांच्या अस्थी कलश दर्शनाचा कार्यक्रम आज म्हसळा शहरात भावपूर्ण वातावरणात पार पडला.म्हसळा एस.टी.स्थानक येथे आयोजित करण्यात आलेल्या या अस्थी कलश दर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते माजी आमदार अनिकेत तटकरे,तालुकाध्यक्ष समीर बनकर,माजी सभापती महादेव पाटील,माजी सभापती नाझिम हसवारे,नगराध्यक्ष अनिकेत पानसरे,गटनेते संजय कर्णिक,माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,मधुकर गायकर,संदीप चाचले,महिला अध्यक्षा मीना टिंगरे, सोनल घोले,रेश्मा कानसे,वनिता खोत,जयश्री कापरे,कविता बोरकर, वृषाली घोसाळकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद उमेदवार अनिल बसवत,अभिषेक विचारे,पंचायत समिती उमेदवार बबन मनवे,लहू म्हात्रे,समृध्दी चाचले, नगरसेविका सरोज म्हशीलकर,नगरसेवक सुनील शेडगे,सुशिल यादव,मधुकर गायकर,भाई बोरकर,गण अध्यक्ष सतीश शिगवण,नाना सावंत,महेश घोले,किरण पालांडे, प्रकाश गाणेकर,अनंत नाक्ती, महादेव गाणेकर,मंगेश म्हशीलकर,गजानन पाखड,मंगेश धिमर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपस्थितांनी स्व.अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्राच्या राजकारणात विकासाभिमुख व कणखर निर्णयक्षम नेतृत्व म्हणून स्व.अजितदादा पवार यांचे योगदान अविस्मरणीय असून त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडलेल्या या कार्यक्रमातून स्व. अजितदादा पवार साहेबांप्रती जनतेच्या मनात असलेले अपार प्रेम आणि आदर पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg