loader
Breaking News
Breaking News
Foto

46 व्या खुल्या राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सेंट थॉमस स्कूलच्या दोन स्केटरची चमकदार कामगिरी

रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया, रोलर रिले स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने गोवा येथील युथ हॉस्टेल, मिरामार पणजी, गोवा या ठिकाणी घेण्यात आलेल्या 46 व्या खुल्या राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सेंट थॉमस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत 2 सुवर्ण, 1 रौप्य व 1कांस्य पदके मिळवले. सदरच्या स्केटिंग स्पर्धेकरिता अनेक स्केटिंगपटूंनी आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये रत्नागिरीतुन ए.बी. स्केटिंग अकॅडेमी व सेंट थॉमस स्कूलमध्ये स्केटिंग प्रशिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांनी आपल्या स्केटिंग खेळातील कौशल्य दाखवून सदरच्या स्केटिंग स्पर्धेमध्ये स्पीड रेस व रिले रेस या स्केटिंग प्रकारांमध्ये उपस्थितांची मने जिंकत विविध पदकांची कमाई केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पदक प्राप्त विद्यार्थ्यां मध्ये 14 वर्षाखालील वयोगटामध्ये स्मित प्रकाश जाधव याने स्पीड रेस प्रकारात-सुवर्ण पदक, रिले रेस प्रकारात-सुवर्ण पदक, व 8 वर्षा खालील वयोगटात - साजवी योगेश पिलणकर, स्पीडरेस प्रकारात - रोप्य पदक, व रिले रेस प्रकारात - कांस्य पदकांची कमाई केली. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे त्यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वरील गुणवंत विद्यार्थ्यांची दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेकरिता निवड झाली आहे.

टाइम्स स्पेशल

यशस्वी स्केटिंगपटुंना स्केटिंग प्रशिक्षक प्रथम अरुण बेग, प्रेम अरुण बेग, तेजस दीपक जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ए.बी. स्पोर्ट्स अकॅडमी रत्नागिरी, या संस्थेचे अध्यक्ष अरुण बेग, सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg