नांदेड - सरपंच पद गावाचे मानाचे पद असल्याने हे पद मिळविण्यासाठी बापाने पोटच्या पोरीला कालव्यात फेकून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने नांदेड जिल्यात खळबळ उडाली आहे. राजकारण हे माणसाला किती खाली आणू शकते, याचे हे उदाहरण आहे. सध्या गावागावात निवडणुकीचे वारे सुरु आहेत. राजकीय नेते गावपातळीवर गुंडांसारखी भूमीका बजावत आहेत. राजकारण्यांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. सामान्य माणूस यात भरडत आहे. पद मिळावे म्हणून पांडुरंग बाबूराव कोंडमंगले वय ३२ रा. केरुर तालुका मुखेड असे या निर्दयी पित्याचे नाव असून या कृत्यासाठी केरुर गावचा विद्यमान सरपंच हाही जबाबदार असल्याने दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
पाडुरंग चा मित्र गावचा विद्यमान सरपंच गणेश शिंदे यांनी त्याला सांगितले की, तुला सरपंच व्हायचे असेल तर मुलीची हत्या करावी लागेल, कारण तिसरे अपत्य चालत नाही. म्हणून त्याने २९ जानेवारी रोजी आपली ७ वर्षाची मुलगी प्राची हिला फिरायला जायचे म्हणून सांगून नेले. तेलंगणा राज्यातील निजामसागर डॅमच्या एका कालव्यावर नेले, पाणी धोधो वाहत होते. चोहिबाजूला निरव शांतता होती. प्रिती बघ पाणी किती चांगले वाहतेय. किती वातावरण चांगले आहे. असे पोटच्या पोरीला सांगितले, त्यावेळी प्रिती म्हणाली बाबा, मला आईसह इथे पुन्हा फिरायला आणा. हो तुला आणेन म्हणत पाठिमागून जोरदार धक्का देत पोटच्या पोरीला वाहत्या कालव्यात फेकून दिले. बाबा बाबा करीत प्रिती वाहून गेली. शेवटी तिचा मृतदेह काही ग्रामस्थांना निजामसागर डॅमच्या परिसरात दिसला, आणि तपासकाम सुरु झाले. शेवटी पोलिस तपासात ही घटना उघड झाली. पोलिसांचे फटके पडताच, होय मी माझ्या मुलीचा सरपंच पदासाठी बळी घेतला, याची कबुली त्याने दिली. सत्तेची हाव माणसाला इतकी आंधळी करते की त्याला आपली रक्ताची माणसेही दिसत नाही. एका चिमुरडीचा बळी घेणारे हे राजकारण म्हणजे आजच्या समाजाला लागलेली वाळवी आहे, असे म्हटले जातेय.






















































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)















































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.