loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूलचे निबंध लेखन स्पर्धेत यश

खेड - मौजे गाव चाकाळे कोळकेवाडी (पुनर्वसन) तर्फे कालकथित शंकर भिकाजी मोहिते यांच्या स्मरणार्थ सोमवार दि.१२ जानेवारी २०२६ रोजी श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल येथे आयोजित निबंध लेखन स्पर्धा पर्व तिसरे २०२६ या स्पर्धेमध्ये श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्यु. कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळ येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले. यामध्ये इ.६ वी ते ८वी च्या गटातून समर्थ झांजे, निधी मोहिते यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच अथर्व तांबे याने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक व पुस्तके देण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना विषय शिक्षिका सुचिता मनवळ यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस.अली यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg