रत्नागिरी, ४ फेब्रु.(वार्ताहर) - नेवरे गावातील शेखपीरवली बाबा हे पुरातन देवस्थान असून ते सोमगंगा नदीतिरावर वसलेेले आहे. या दर्गेचा ऊरुस अनेक वर्ष मोठ्या उत्साहात साजरा होता. यंदा गुरुवार दि. ५ फेब्रुवारी रोजी ऊरुस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने रात्री ९ वाजता संदल व गिलाफ मिरवणूक बाजारपेठ-मुस्लिमवाडी ते शेख पीरवली दर्गापर्यंत पारंपारिक पद्धतीने काढण्यात येणार आहे. दि. ६ रोजी दुपारी शेख ’पीरवली दर्गा प्रांगणात नियाज (महाप्रसाद) होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता मुरादवली नंगडेपीर व हसनपीर वली बाबांच्या उरुसानिमित्त बाजारपेठ येथून दर्गापर्यंत संदल व गिलाफ मिरवणूक निघेल. रात्री दोन्ही दर्यातं ग्यारवी शरीफचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वाजता नंगडे पीर बाबा दर्गा परिसरात नियाज (महाप्रसाद) होणार आहे. त्यानंतर लकी ड्रॉ सोडत व करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे.
दि.७ रोजी सकाळी १० वाजता उत्कर्ष मंडळ येथे शेख पीरवली बाबा उरुस कमिटीतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. दुपारी १२ वाजता हसनपीर बाबा दर्गा परिसरात नियाज (महाप्रसाद) होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता. ’हजरत सय्यद गयासुद्दीन चिश्ती’ यांच्या उरुसानिमित्त सायंकाळी ७ वाजता संदल व गिलाफ मिरवणूक व त्यानंतर नियाज (महाप्रसाद) होणार आहे. रात्री प्रसिद्ध कव्वाल त्तौसिफ जुनेदी (पुणे) यांचा कव्वालीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. उरुसातील या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन शेख पीरवली बाबा उरुस कमिटीतर्फे करण्यात आले आहे.






















































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)















































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.