देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील श्री खडगेश्वरच्या महशिवरात्र उत्सवाला गुरुवार दि.१२ फेब्रुवारी २०२६ पासून सुरुवात होणार असून दि.१८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत हा उत्सव चालू राहणार आहे. उत्सव काळात देशविदेशातून भाविक दर्शनासाठी, श्रींची सेवा करण्यासाठी येत असतात. उत्सव काळात दररोज धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली जाते.
दररोज रात्री११ वाजेपर्यंत आरती, छबिना, मंत्रपुष्पांजली असे धार्मिक कार्यक्रम होतील. यात ह.भ.प.श्री.ज्ञानेश जोशी (धानोरकर बुवा)(पुणे) यांचे कीर्तन होणार असून संवादिनी साथ हेमंत देशमुख (रत्नागिरी) व तबला साथ सुधिर जोशी (ऊगार) हे करतील. गुरुवार दि. १२ फेब्रुवारी ८ वा. मंत्रजागरण, ९ते ११ वा.आरती , छबिना, रात्री कीर्तन पुष्प १. शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी ३ वा.पाठान्तर व सूर्य नमस्कार स्पर्धा (पंचक्रोशी मर्यादीत), रात्रौ ११ वा. कीर्तन पुष्प २. शनिवार दि.१४ रोजी ३ ते ४ वा.वार्षिक सभा सायंकाळी ४ ते ६ वा.कीर्तन पुष्प ३, सायंकाळी ६ ते रात्रो ७.३० वा. काव्य मैफिली सादरकर्ते कवितांगण ग्रुप देवळे, रात्रौ ११ वा. मराठी/हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादरकर्ते स्वर संध्या, रत्नागिरी. रविवार १५.२.२६रोजी महाशिवरात्री उत्सव. सायंकाळी ५.३० ते ९ स्पर्धा, कै . सुधाकर वळामे स्मृती भजन सेवा (स्थानिक भजनी मंडळे) बक्षिस वितरण समारंभ, रात्रौ ११ ते २.३० वा. आरती, छबिना, २.३० ते ४.३० वा. कीर्तन पुष्प ४. सोमवार दि. १६.२.२६ रोजी ४ ते ६ वा. कीर्तन पुष्प ५ , रात्रौ ११ वा. दोन अंकी तुफान विनोदी नाटक, लव लग्न लोच्या, सादरकर्ते श्रीरंग रत्नागिरी. मंगळवार दि. १७.२.२६ रोजी सायं.चार ते सहा कीर्तन पुष्प ६, रात्रौ ११ वा. जोडी तुझी माझी (होम मिनिस्टर स्पर्धा) स्पर्धा खुल्या गटात होईल. बुधवार दिनांक १८.२.२६ रोजी १२.३० ते २.३० महाप्रसाद असे कार्यक्रम होतील. महाशिवरात्र काळातील या कार्यक्रमांचा सर्व शिवभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खडगेश्वर संस्थावर्धक मंडळी, अध्यक्ष श्रीकांत वळामे, कार्यवाह सुबोध करकरे, निमंत्रक बन्सी आठल्ये यांनी केले आहे.






















































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)















































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.