loader
Breaking News
Breaking News
Foto

दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी येथे तालुकास्तरीय आंतरशालेय कथाकथन स्पर्धा संपन्न

बुरंबी (संगमेश्वर) - येथील दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी शिवने येथे बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबई वतीने तालुकास्तरीय आंतरशालेय कथाकथन स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. कार्यक्रमच्या सुरुवातीस व्यासपीठावरील देवी सरस्वतीस सौ ऋतुजा कदम (सरपंच, ग्रामपंचायत, लोवले) तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस प्राचार्य प्रकाश विरकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक करताना सहाय्यक शिक्षक सुहास गेल्ये यांनी कथाकथन स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी शरद गोविंद बाईत, स्कुल कमिटी अध्यक्ष व संस्था संचालक दिनेश शामराव जाधव, तसेच ऋतुजा कदम (सरपंच, ग्रामपंचायत, लोवले) यांनी कथाकथन स्पर्धेच्या आयोजनासंबधी माहिती दिली व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व उपस्थित मान्यवरांचे संस्था व शाळेच्या वतीने पुषगुच्छ देऊन स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मराठी, इंग्रजी व हिंदी या भाषा विषयासाठी संपन्न झालेल्या या तालुकास्तरीय आंतरशालेय कथाकथन स्पर्धेमध्ये भाषा मराठी विभागत तिर्था विनोद निंबाळकर (कै सौ मिनाताई ठाकरे विद्या. साडवली) प्रथम, राधिका संतोष ढोल्ये (दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी) द्वितीय, शर्वरी संजय बांडगुळे (पी.एस.बने इंटर. स्कुल साडवली तृतीय तर उत्तेजनार्थ पुर्वा अनिरुद्ध आठल्ये (श्रीमान तु.ग. गांधी विद्या. कोंडगाव) व कल्याणी सचिन साठे (माखजन इंग्लिश स्कुल माखजन) या उत्तेजनार्थ म्हणून रोख बक्षिस, सन्मानचिन्ह व गौरवपत्र देवून मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले भाषा इंग्रजी विभागामध्ये आकांक्षा योगेश सप्रे (दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी) प्रथम, मर्याम रहिल जावले (कडवई इंग्लिश मिडीयम ल, कडवई) द्वितीय, विभा रामचंद्र पंदेरे (एस.बने इंटर, स्कुल साडवली) तृतीय तर विभा मिलिंद माने (माखजन इंग्लिश स्कुल माखजन व तनया तुषार गुरव (नवजीवन विद्यालय फुणगुस) यांना उत्तेजनार्थ रोख बक्षिस, सन्मानचिन्ह व गौरव प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. भाषा हिंदी विभागामध्ये रिया रविंद्र गिजे (माध्यमिक विद्यामंदीर ताम्हाने) प्रथम, अनन्या कुळदीप डोळस (दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी) द्वितीय, चैत्राली निलेश शिंदे (माध्यमिक विद्यालय सोनवडे) तृतीय तर दुर्वा संदीप लिंगायत (जनता विद्यालय आंगवली) व गायत्री संदीप मुंडेकर (नवजीवन विद्यालय फुणगुस) यांना उत्तेजनार्थ रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व गौरव प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमास संस्था उपाध्यक्ष प्रताप नारायण देसाई यांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या, कथाकथन स्पर्धेस सहाय्यक शिक्षक उज्वला विलास मांडवकर (जि.प. शाळा देवरुख क्र.०३), मेघा सिताराम भालेकर (आश्रमशाळा कला विज्ञान कॉलेज निवे), मानसी प्रसाद गानू (गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी), मंगेश शामराव जाधव (श्रीन अ. अ. पाध्ये इं.मेडी. स्कुल देवरुख), दिलीप तांबे (र.दि. गार्डी विद्या. कळंबस्ते), पृथ्वीराज संजय वाडकर (नवनिर्माण कॉलेज लोवले) यांनी परीक्षक म्हणून काम पाहीले. यावेळी परीक्षकांनी बक्षिस वितरणाच्या वेळी प्राविण्यधारक व सहभागी विद्यार्थ्यांना संबोधताना,- संस्थेने कथाकथन स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना त्यांचे प्रगल्भ विचार मांडण्यास व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांची कथाकथनामध्ये समय सूचकता, हावभाव व त्यानी मांडलेल्या विषयाचे उत्तमरित्या सादरीकरण पहावयास मिळाले व प्राविण्य मिळविलेल्या स्पर्धकांमुळे सहभागी विद्यार्थ्यांना आपणामध्ये आणखी सराव, सादरीकरण यासाठी मेहनत घेणे आवशब्क आहे व मांडणी कशी करावी हे समजले. संस्थेचा हा उपक्रम स्तुत्य असून यामुळे विद्यार्थी घडण्यासाठी नक्कीच उपयोग होणार आहे, असे सांगितले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी शालेय मराठी विषय विभाग प्रमुख शितल शैलेश सावंत, हिंदी विषय प्रमुख सुहास तानाजी तर इंग्रजी विषय विभाग प्रमुख स्मिता सुभाष हर्डीकर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg