loader
Breaking News
Breaking News
Foto

दुर्गंधीने पटवर्धन हायस्कूलचे विद्यार्थी हैराण

रत्नागिरी - रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूल परिसरात टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे भीषण दुर्गंधी पसरली असून शाळेतील विद्यार्थी व परिसरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या कडेला साचलेल्या या कचऱ्यातून सतत दुर्गंधी येत असून मोकाट जनावरे कचऱ्यात तोंड घालत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून श्वसनाचे त्रास, डोकेदुखी, मळमळ अशा समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच कचरा साचल्याने विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कचरा कुंडीबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. कचरा कुंडी अन्य ठिकाणी हलवावी, नियमित उचल व स्वच्छता करावी, अशी मागणी पालक, शिक्षक व स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत असताना देखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मोकाट जनावरे, कचऱ्यातून पसरणारे जंतुसंसर्ग आणि दुर्गंधी यामुळे शाळेच्या परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे. “स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी” ही संकल्पना नेमकी प्रत्यक्षात कधी उतरणार? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

टाइम्स स्पेशल

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक वातावरण लक्षात घेता संबंधित नगरपरिषद व प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन कचरा कुंडी हटवावी, परिसराची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे, अन्यथा नागरिक व पालक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही देण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg