loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडचा विद्यार्थी कु. स्पंदन धामणे याचा राज्यस्तरावर गौरव

खेड (प्रतिनिधी) - श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीव्दारा संचालित विज्ञान महाविद्यालय, नागपूर येथे 53 वी राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनी भव्यदिव्य पद्धतीने पार पडली. या प्रतिष्ठित प्रदर्शनीत रोटरी स्कूलचा विद्यार्थी कु. स्पंदन गौरव धामणे याने सलग दुसऱ्यांदा पाचवा क्रमांक पटकावून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळवला. या प्रदर्शनाचा मुख्य विषय 'विकसित आणि आत्मनिर्भर भारत स्टेम‘ असा आहे. सदरच्या स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलमधील कु. स्पंदन धामणे (इ. 8वी) याने 'कॅश्युशेलोरा ’ हा प्रकल्प सादर केला. स्पंदनने सादर केेलेल्या या प्रकल्पाचा राज्यस्तरावर पाचवा क्रमांक प्राप्त झाला आहे. स्पंदन यांनी केलेल्या या प्रकल्पाला तालुका व जिल्हा स्तरावरती प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता त्यासाठी कु. अर्णव परकाळे याची त्याला साथ लाभली होती. तसेच हा प्रकल्प करण्यासाठी स्पंदनला त्याच्या पालकांनी बहुमोल मार्गदर्शन केले होते. स्पंदनच्या या उल्लेखनीय यशामुळे रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कु. स्पंदनला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कु. स्पंदनला रोटरी स्कूलच्या विज्ञान विभागप्रमुख सौ. रिया पवार, सौ. शर्वरी धामणे, सर्व विज्ञान विषय शिक्षक तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी स्पंदनचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg