loader
Breaking News
Breaking News
Foto

जनसामान्यांच्या विकासासाठी कटीबद्ध: अनंत गोंधळी

अलिबाग (वार्ताहर) - स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुक प्रचार अंतिम टप्प्यात येत असताना उमेदवार आणि कार्यकर्ते पायाला भिंगरी लागल्यागत मतदार संघात फिरत असताना पहायला मिळत आहेत. अलिबाग तालुक्यातील कावीर जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेने तालुका प्रमुख अनंत गोंधळी यांना उमेदवारी दिली आहे. जनसामान्यांच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया अनंत गोंधळी यांनी व्यक्त केली आहे. कावीर मतदार संघात या वेळी तिरंगी लढत होणार आहे. सेनेच्या अनंत गोंधळी यांच्या सह शेकापचे मोहन धुमाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीधर भोपी हे दोन उमेदवार रिंगणात आहेत. अनंत गोंधळी हे 1992 पासून अलीबागच्या राजकारणात सक्रिय आहेत. आपल्या राजकारणाची सुरुवात त्यांनी शिवसेनेच्या विचाराने केली. त्या नंतर अलिबागेत माजी आमदार स्व.मधुकर ठाकूर यांच्या कार्य प्रणालीवर प्रभावित होऊन काँग्रेसमध्ये आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर मधुकर ठाकूर यांच्या सोबत त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहिले. त्यानंतर त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांचे नेतृत्व स्वीकारून शिंदे सेनेत प्रवेश केला. गेली 30 वर्षाहून अधिक काळ राजकारणात असलेले अनंत गोंधळी यांनी या पूर्वी 2007 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. खानाव ग्रामंचायत सरपंच म्हणूनही त्यांनी अनेक विकासात्मक काम केले आहे. मितभाषी, आणि जनसंपर्क असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांची हीच जमेची बाजू ओळखून त्यांना सेनेने कावीरमधून उमेदवारी दिली आहे.

टाइम्स स्पेशल

केवळ निवडणुकी पुरते राजकारण केले नाही. किंवा करीत नाही. जनतेच्या हाकेला अर्ध्या रात्री धावून जाण्याची वृत्ती असल्याने जनतेमध्ये एक वेगळे वलय आहे. त्यांचा मिळणारा प्रतिसाद हा कौतुकास्पद असल्याचे अनंत गोंधळी यांनी सांगितले. माझ्या मतदार संघात भेडसावणाऱ्या पाणी, रस्ते आणि इतर मूलभूत समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले. बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. मात्र माझ्या मतदार संघातील प्रकल्पात आजवर अनेकांना रोजगार मिळून दिला आहे. या पुढे ही रोजगाराचा प्रश्न सोडविण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे अनंत गोंधळी यांनी सांगितले. माझ्यासोबत कावीर पंचायत समितीच्या गणातून सेनेचे संतोष निगडे आणि रामराज मधून तृषा भगत यांना देखील मतदाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे अनंत गोंधळी यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg