loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमधील प्रसिद्ध ठेकेदार भिमसिंग राठोड यांचे निधन

खेड : श्री गुरुसेवा लाल कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक भिमसिंग रामा राठोड यांचे दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८० वर्षे होते. त्यांच्या निधनाने भरणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भिमसिंग रामा राठोड हे कष्टाळू, प्रामाणिक व दूरदृष्टी असलेले उद्योजक म्हणून परिचित होते. गुरुसेवा लाल कन्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याच्या साधेपणा व माणुसकीमुळे ते सर्वांच्या मनात आदराचे स्थान मिळवून होते. ते मल्लू राठोड यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन मुली, आप्तेष्ट असा मोठा परिवार, कुटुबीय, नातेवाईक आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचा अंत्यविधीला दापोली, खेड, मंडणगड, चिपळूणमधून नातेवाईक उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg