loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडशी पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांनीच प्रचाराची धुरा खांद्यावर घेतल्याने वैभव पाटील यांचा विजय निश्‍चीत

रत्नागिरी - रत्नागिरी तालुक्यातील खेडशी पंचायत समिती गणात महायुतीचे उमेदवार वैभव विठोबा पाटील हे निवडणुक लढवित असून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उमेदवार वैभव पाटील यांनी मतदारांसमोर बोलताना सांगितले की, लोकसेवेसाठी व आपल्या पंचायत समिती गणातील प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी उभा आहे. मला वेगवान व प्रगतीशील विकासाची प्रक्रिया राबवायची आहे. एक नवी दिशा देण्याच्या उद्देशाने वैभव पाटील निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याचे म्हटले जात आहे. कृषी, औद्योगी, शैक्षणिक, सांस्कृतीक, युवक कल्याण आणि सामाजिक प्रगतीचा संपूर्ण अभ्यास करुन वैभव पाटील निवडणुकीला सामोरे जात आहेत. रत्नागिरी तालुका कबड्डी असोशिएशन अध्यक्ष म्हणून कामगिरी बजावत असले तरी साधा राहणीमान आणि उच्च विचारसरणी याचे उदाहरण वैभवदादा आहेत, असेही म्हटले जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपल्या खेडशी मतदार संघाचा खर्‍या अर्थाने विकास करण्यासाठी वैभव विठोबा पाटील यांचे मोठे योगदान ठरणार आहे. आपल्या परिसराच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी त्यांच्यासारख्या खंबीर नेतृत्व आणि लोकांसाठी झटणार्‍या कार्यकर्त्याची गरज असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या आशिर्वादाने वैभव पाटील यांना चोहिकडे मोठा पाठिंबा मिळत आहे. आता तर कार्यकर्त्यांनी निवडणुक प्रचाराची धुरा खांद्यावर घेतल्याने वैभव पाटील यांचा विजय निश्‍चीत म्हटला जात आहे, तशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी खेडशी मतदार संघात बोलताना व्यक्त केली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg