loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्वलनशील गॅस वाहतूक वाहनांचा प्रश्‍न जिल्ह्यात ऐरणीवर

रत्नागिरी (टाइम्स डेस्क) - संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी घाट रस्त्यावर २ फेब्रुवारी रोजी गॅस टँकर आणि कार यांच्यात अपघात झाला. निष्काळजी व धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याने उपघात झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली होती. या प्रकरणी नरेश लक्ष्मण वरेकर यांनी मुंबई पोलिसांत याबाबत चौकशीसाठी निवेदन सादर केले. ज्या ज्वलनशील गॅस टँकर आणि कार अपघात त्यामध्ये ज्वलनशील गॅस टँकर असूनही त्या वाहनाकडे ज्वलनशील चेतावणी चिन्ह नव्हते. कोणताही सहाय्यक क्लिनर नव्हता. एएम परिवर्तन प्रणालीवर वहानाचे फिटनेस प्रमाणपत्र २०२५ मध्ये समाप्त झाले आहे. तरीही वाहन सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे चालत होते. अशा प्रकारे ज्वलनशील गॅस वाहतूक करणे सार्वजनीक सुरक्षेस अत्यंत धोकादायक असून मोठ्या प्रमाणात दुर्घटना होण्याची शक्यता आहे. हा प्रकार केवळ वैयक्तिक अपघात नसून जनहिताचा व सार्वजनीक सुरक्षेचा गंभीर प्रश्‍न आहे, असे डिंगणी मार्गावरील अपघाताच्या घटनेतून सुरक्षित बचावलेले नरेश लक्ष्मण वरेकर यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे आता ज्वलनशील गॅस वाहतूक वाहनांचा प्रश्‍न जिल्ह्यात ऐरणीवर येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg