loader
Breaking News
Breaking News
Foto

खासदार सुनिल तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याने खारगाव खुर्द गावासाठी गेटेड सिमेंट काँक्रिट बंधारा

म्हसळा – रायगड : म्हसळा नगर पंचायत लगत असलेल्या खारगाव खुर्द या मोठ्या लोकवस्तीच्या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेला अधिक बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत गेटेड सिमेंट काँक्रिट बंधारा उभारणीसाठी तब्बल ५०,४०,७६०/- लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. खासदार सुनिल तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे हा महत्वपूर्ण निर्णय शक्य झाला असल्याचे गाव सुपुत्र माजी सभापती महादेव पाटील यांनी माहिती देताना सांगितले. गावाची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाणीपुरवठ्याची गरज ओळखून ही योजना तातडीने मंजूर करण्यात आली असून या निर्णयाचे खारगाव खुर्द ग्रामस्थांनी समाधान व आनंदाने स्वागत केले आहे. उपरोक्त कामासाठी जिल्हा नियोजन समिती, रायगड यांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून हे बांधकाम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या २०२२-२३ दरसूचीनुसार निविदेतील अंदाजित खर्च भाग १ रुपये ४०,७६,१२६/- आणि भाग २ रुपये ९,६४,६३४/- एकूण निधी रुपये ५०,४०,७६०/मंजूर करण्यात आले आहेत. सदरची कामे उपविभागीय जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण उपविभाग, माणगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात येणार असून संपूर्ण प्रकल्प एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन आहे अशी माहिती माजी सभापती महादेव पाटील यांनी दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रवादी काँग्रेसचे माध्यमातून खासदार सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे, युवा नेते अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून खारगाव खुर्द, सकलप गावाचा विकास होत असल्याने ग्रामस्थानी एका छत्राखाली येवून गावाचा अधिकतम विकास साधावा असे आवाहन माजी सभापती महादेव पाटील यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg