loader
Breaking News
Breaking News
Foto

विज्ञानमध्ये प्रगती करते तो समाज, ते राष्ट्र नेहमी विकसित हेते : युवा उद्योजक शैलेश दळवी

साटेली (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभाग आणि पंचायत समिती, दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे दोडामार्ग तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 'विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM'या विषयावर मंगळवार, दिनांक ०९ व १० डिसेंबर २०२५ या दोन दिवसांच्या कालावधीत तिलारी खोरे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एम.आर.नाईक विद्यालय, कोनाळकट्टा येथे आयोजन करण्यात आले. त्याचा उदघाट्न सोहळा आज युवा उद्योजक तथा संस्थेचे उपाध्यक्ष शैलेश दळवी यांच्या हस्ते उदघाट्न सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तिलारी खोरे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एम. आर.नाईक विद्यालय, कोनाळकट्टा या संस्थेचे उपाध्यक्ष शैलेश दळवी यांच्या सह गटशिक्षण अधिकारी निसार नदाफ, सरपंच अस्मिता गवस, उपसरपंच रत्नाकर कर्पे, नंदकुमार म्हापसेकर, विठ्ठल गवस, गटसमन्वयक सूर्यकांत नाईक, संस्थेच्या सचिव नाईक, संचालक सुधाकर बांडेकर, विलास नाईक, मुख्याध्यापक विश्वनाथ सावंत, केंद्र प्रमुख सुधीर जोश, अंजली जोशी, माध्यमिक मुख्याध्यापक संघ तालुका अध्यक्ष नंदकुमार म्हापसेकर, माध्यमिक शिक्षक भारती संघटना तालुका अध्यक्ष अरुण गवस, तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष बामणिकर, खजिनदार फर्जंद, प्रयोग शाळा परिचर संघटना तालुका अध्यक्ष विष्णू लोंढे, माध्यमिक शिक्षकेतर संघटना तालुका अध्यक्ष शाबी तुळसकर, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ तालुका अध्यक्ष संतोष गवस, महाराष्ट्र शिक्षक समिती तालुका अध्यक्ष अध्यक्ष महेश काळे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका अध्यक्ष संतोष केरकर, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवससह आदी उपस्थित होते. शैलेश दळवी यांच्या हस्ते सरस्वती च्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून व द्विप प्रज्वलन करून तसेच क्रीडा ज्योत द्विपप्रज्वलीत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

युवा उद्योजक शैलेश दळवी मार्गदर्शन करताना म्हणाले की, विज्ञान हा विषय आज समाजामध्ये जगामध्ये महत्वाचा घटक झालेला आहे. जो समाज, जे राष्ट्र विज्ञानमध्ये प्रगती करते तो समाज ते राष्ट्र नेहमी विकसित हेते. आज अमेरिका चीन सारख्या देशाने जी विज्ञानमध्ये प्रगती केली त्याच्या जोरावरच आज ते जगावर राज्य करत आहेत. त्याचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे. आपल्या देशामध्ये मोठ मोठे वैज्ञानिक होऊन गेले त्यांच्या पावलावर आपण पाऊल ठेवले पाहिजे. असे विज्ञाप्रदर्शन वारंवार करावे जेणेकरून आपल्या तालुक्यातून आपल्या जिल्ह्यातून मोठे वैज्ञानिक निर्माण होतील आपले नाव आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे नाव देश पातळीवर उज्वल करतील. ज्या शाळामध्ये कमी पटसंख्या आहे. त्या शाळा बंद करण्याचा जो शासनाने निर्णय घेतलेला आहे. तो देखील अत्यंत चुकीचा आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर यांची परंपरा असलेल्या या महाराष्ट्रामध्ये निधीची कमतरता असल्याने जर शाळा बंद होत असतील तर ते आपल्यासाठी अजिबात भूषणावह नाही या विषयाचा देखील शासन पुनरविचार करेल ग्रामीण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनावर होणारा अन्याय बंद करेल अशी मी अपेक्षा दळवी यांनी व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

गटशिक्षण अधिकारी निसार नदाफ म्हणाले की, जर आपल्याला आपला भारत देश विकसित आणि आत्मनिर्भय घडावायांचा असेल तर सायन्स, टेकनॉलॉजि, इंजिनिअरिंग आणि मॅथामॅटिक्स हे चार खांब आपण जर का मजबूत केले तर आपला भारत देश विकसित व्हायला कोणतीही अडचण येणार नाही. या अनुषंगाने आजचे विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेले आहे. विज्ञान आणि अनुकूलता हे एक नात आहे ते विद्यार्थ्यांनी जपलं पाहिजे असे आवाहन नदाफ यांनी केले. दरम्यान गटाविकास अधिकारी अजिंक्य सावंनी आणि डॉ. रामदास रेडकर यांनी या विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली. यावेळीशिक्षक सूर्यकांत नाईक, विठ्ठल गवस, नंदकुमार म्हापसेकर, सरपंच अस्मिता गवस यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती आडेलकर यांनी तर प्रास्ताविक बामणिकर व आभार विश्वनाथ सावंत यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg