loader
Breaking News
Breaking News
Foto

दादासाहेब सरफरे विद्यालयात एकाग्रता व व्यक्तिमत्व विकासाबाबत मार्गदर्शन आणि डिएमआयटी टेस्ट

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी-शिवनेमध्ये शुक्रवार दि. १२ डिसेंबर रोजी इ.९ वी व इ.१० वीच्या विद्यार्थ्यांना एकाग्रता व व्यक्तिमत्व विकासाबाबत मार्गदर्शन व्याख्यान आणि डिएमआयटी टेस्ट करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांमधील अंतर्गत क्षमता शोधणे आणि त्याअनुषंगाने करिअर मार्गदर्शन, मेंदूच्या कार्यपद्धती बाबतची माहिती, व्यक्तीच्या बौदिक क्षमता, अध्ययन पद्धती, विविध कौशल्यांचे परीक्षण, एकाग्रता वाढ कशी करावी यावर विवेचन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच शरीरातील उर्जा पातळी वाढविणे वैज्ञानिक तत्वावर आधारित चाचणी याविषयी मार्गदर्शन विजय रॉबर्ट यांनी केले. हि टेस्ट आणि मार्गदर्शन शिबिर कैझेन या संस्थेच्या वतीने घेण्यात आले. यावेळी व्यासपिठावर सहकार विद्यालय खेर्डी चिपळुणच्या प्राचार्या अनिता सपकाळ, बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस शरद बाईत, शाळा समिती अध्यक्ष दिनेश जाधव, संस्था संचालक सचिन मोहिते, मुख्याध्यापक प्रकाश विरकर, चिपळूणचे अनिरुद्ध शिंदे आदि उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

कैझेन या संस्थेचा पुढाकार

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg