loader
Breaking News
Breaking News
Foto

खेकडा शेती प्रकल्पास शासकीय प्रोत्साहन आवश्यक -- डॉ. केतन चौधरी

रत्नागिरी - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे “खेकडा पालन: व्यवस्थापन” या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रम आयोजन करण्याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोलीचे सन्मानिय कुलगुरु डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे व विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाचा उद्घाटन कार्यक्रम सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी डॉ. चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये महाराष्ट्र व गोवा राज्यात खेकड्याला फार मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे खेकडा पालन या व्यवसायाला मोठे भविष्य आहे. तसेच खेकडे पालन करण्यारा शेतकर्यांच्या मागणीनुसार भविष्यात खेकडा पालन हा प्रकल्प पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेत समावेश केल्यास खेकडा शेतीतून स्वयं-रोजगार संधी आणि पर्यावरण पूरक व्यवसाय उपलब्ध होईल. या कार्यक्रमाची प्रस्तावना सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्राध्यापक डॉ. आसिफ पागरकर यांनी केली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संशोधन केंद्राचे माजी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. सुरेश नाईक उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये खेकडा पालन या उद्योगाला यशस्वी होण्यासाठी सुरक्षितपणे खेकडा पकडता येणे आवश्यक आहे तसेच सर्वांनी एकत्रीत होऊन खेकडा समुदाय गट तयार केल्यास आपल्या उद्योगाला कसा फायदा होईल याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी खेकडा पालनातील आपले अनुभव कथन केले.

टाइम्स स्पेशल

प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान खेकड्यांच्या विविध जातींची ओळख व जीवनचक्र’ आणि ‘खेकडा पालनः विविध पध्दती’ याविषयी श्रीम. वर्षा सदावर्ते, तर ‘खेकडा पालन व्यवस्थापन संच निर्मिती आराखडा’ आणि ‘जिवंत खेकडा पालन: हाताळणी आणि व्यवस्थापन’ याविषयी डॉ. हरीष धमगाये यांनी मार्गदर्शन केले, ‘खेकडा पालनः पाण्याचे गुणधर्म, पाण्याचे व्यवस्थापन’ याविषयी श्रीम. अपूर्वा सांवत, ‘खेकडा खादय व्यवस्थापन’ आणि ‘खेकडा पालनः विक्री व्यवस्थापन’ याविषयी श्री नरेंद्र चोगले, ‘खेकडा पालनः काढणी आणि बांधणी (प्रात्यक्षीक) व्यवस्थापन. याविषयी श्री. सचिन साटम, ‘खेकडा पालनः रोग आणि व्यवस्थापन’ याविषयी डॉ. आसिफ पागारकर आणि ‘खेकडा पालनः प्रकल्प अहवाल आणि अर्थशास्त्र’ याविषयी डॉ. के जे चौधरी यांनी मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष या व्यवसाया मध्ये काम करीत असलेले गोवा येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे माजी विद्यार्थी शुभम पवार यांनी ऑनलाईन गुगलमिटद्वारे खेकडा संच प्रत्यक्ष हाताळणी विषयी प्रात्यक्षीकासह अनुभव कथन केले तर रत्नागिरीतील जफर वाडकर यांनी खेकडा पालन व्यवसायातील स्व: अनुभव कथन करून मार्गदर्शन केले. प्रादेशिक कृषी कार्यालय, बर्डेझ, गोवाचे कृषी अधिकारी श्रीमती पूजा महालकर यांनी गोव्यातील प्रशिक्षणांर्थी शेतकरी खेकडा पालन व्यवसाय सुरु करण्याबाबत ग्वाही दिली आणि प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg