loader
Breaking News
Breaking News
Foto

क्रीडा आणि कला विकास मंडळ कुणकेरीच्या अध्यक्षपदी नितीन सावंत

क्रीडा व कलात्मक संस्कृतीला व्यासपीठ प्राप्त करून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागामध्ये वाचन चळवळ रुजविण्यासाठी कुणकेरी गावामध्ये क्रीडा आणि कला विकास मंडळाची स्थापना करण्यात आली होती. गेली 41वर्षे हे मंडळ विविध कलात्मक, क्रीडात्मक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम यशस्वीपणे राबवित असून गावाच्या विकास कार्यात तसेच सामाजिक चळवळीमध्ये सक्रीय आहे. नुकतीच या मंडळाच्या नवीन कार्यकरणीची निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मंडळाच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदचे आदर्श तसेच उपक्रमशील शिक्षक नितीन नामदेव सावंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, तसेच उपाध्यक्षपदी जिल्हा परिषदचे आदर्श तसेच उपक्रमशील शिक्षक अरविंद नारायण सरनोबत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

मंडळाच्या सचिवपदी राजन गोविंद मडवळ, सहसचिवपदी एकनाथ गोविंद सावंत, खजिनदारपदी विश्राम सुधाकर सावंत तसेच संचालक म्हणून माजी सभापती प्रमोद मोहन सावंत, निता नितीन सावंत, भरत भाऊ सावंत, गणेश दत्ताराम परब, रचना रघुनाथ आळवे, रोहिणी रमेश गावडे यांची निवड करण्यात आली. मंडळाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मंडळाचा मानस आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg