loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

संगलट खेड (इक्बाल जमादार) - मुंबई–गोवा महामार्गावर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. मुंबईहून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने मागून कंटेनरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात कोलाडजवळील पुई गावाच्या हद्दीत घडला. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने कोलाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कारमध्ये एक व्यक्ती अडकली होती. त्याला हायड्रॉलिक कटरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती सज्जाद अब्दुल शकूर सरखोत. हे आपल्या मुलाच्या लग्नासाठी भारतात आले होते. ते नोकरीसाठी कत्तर मध्ये होते. रात्री ते भारतामध्ये आल्यानंतर माणगाव तालुक्यातील ओणीपुरार या गावी येत होते. अपघातामध्ये वडिलांचा आणि ओवेश यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ओवेस याचा लग्न 29 डिसेंबरला होणार होते. या अपघातामध्ये सज्जाद अब्दुल शकूर सर खोत त्यांचा लहान मुलगा सरजीला हा सुद्धा तसेच चालकही गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg