loader
Breaking News
Breaking News
Foto

सोडली मुंबईची नोकरी, शेतीत यशाची भाकरी

संगलट (खेड)(इक्बाल जमादार) - शेतीमध्ये काही राम नाही, असं म्हणणारे अनेकजण भेटतात; पण शेतीतूनच आपल्या आणि आपल्या कुटुंबाचं रामराज्य करण्याचं यश फार थोड्या लोकांना मिळतं. शेतीतून सोने कसे उगवायचे, त्यातीलच एक म्हणजे दापोली तालुक्यातील नारगोली गावातील पदवीधर पंकज सुरेश झगडे! मुंबईतील नोकरीची वाट सोडून गावाकडे परतलेला हा तरुण शेतीत रमला आणि केवळ रमला नाही तर पत्नीच्या व वडील सुरेश झगडे यांच्या साथीने यशस्वीही झाले. वडिलांनी आपल्या मुलाला स्वतःच्या पायावर उभा करून शेतीचे चांगले धडे दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दर महिन्याला ठराविक रक्कम पदरात पाडून देणारी मुंबईतील सुरक्षित नोकरी सोडून शेतीत करिअर घडवण्याचा निर्णय धाडसीच होता. मन रमले नाही म्हणून नोकरी सोडणे सोपे होते; परंतु मर्यादित वडिलोपार्जित जमिनीतून शेती सुरू करणे हे मोठे आव्हान होते. अशावेळी शेती कशी तोट्याची असाच सल्ला अनेकजण देतात; पण सगळ्या आव्हानांना सामोरे जात पंकज यांनी भाड्याच्या शेतीतून आपल्या कृषी प्रवासाची सुरुवात केली. केवळ भात शेतीवर अवलंबून राहण्याऐवजी त्यांनी दुबार पीकपद्धती स्वीकारली. आधी भात पिकाने फटका बसला, तरीही त्यांनी धीर न सोडता कलिंगड, भाजीपाला आणि पावटा यांसारख्या पिकांवर भर दिला. त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणून तब्बल १०० टन कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेण्यात त्यांनी यश मिळवले. उत्तम मार्केटिंग कौशल्यामुळे उत्पादनाला योग्य बाजारभाव मिळत गेला आणि आर्थिक स्थैर्य मिळत राहिले.

टाइम्स स्पेशल

आई-वडील आणि पत्नी प्राजक्ता यांच्या खंबीर साथीत पंकज आज आठ ते दहा एकर भाड्याच्या जमिनीत आधुनिक शेतीचे आदर्श मॉडेल तयार करत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरुवात केलेल्या या तरुणाने आता सर्व आधुनिक कृषी अवजारे, वाहतूक आणि विक्री व्यवस्था उभी केली आहे. कोकणातील तरुण नोकरीच्या शोधात मुंबईकडे धाव घेत असतात मात्र पंकज शेतीचाच मार्ग सुकर करत आहे. त्यांनी अनेक सुशिक्षित तरुणांना मोफत आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देत ग्रामीण भागात कृषी उद्योजक तयार करण्याचे कार्य सुरू केले आहे. सेंद्रिय शेतीचा पर्याय स्वीकारण्याचा निर्धार आणि कष्टावरची निष्ठा हीच पंकज झगडे यांच्या यशोगाथेची खरी ओळख आहे. कोकणातील तरुणांसाठी ते एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

नारगोलीतील तरुण पंकज झगडे यांची आदर्श यशोगाथा

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg