loader
Breaking News
Breaking News
Foto

फोंडाघाट येथील चोरीप्रकरणी चौथा आरोपी एलसीबीच्या ताब्यात

कणकवली (प्रतिनिधी)- फोंडाघाट येथे सकाळच्या सुमारास घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पसार झालेल्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा पथकाने ताब्यात घेतले होते आता आणखी एका आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री सांताक्रुज मुंबई येथे अटक केली. विल्सन जॉन पिंटो (५६, रा. सांताक्रुज) असे चोरट्याचे नाव आहे. ही घटना फोंडाघाट येथे 30 नोव्हेंबरला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली होती. तृप्ती लिंग्रस व त्यांची आई या दोघी घरी होत्या तर तृप्ती लिंग्रस यांचे भाऊ मॉर्निंग वॉकला गेले होते. याच दरम्याने वरील तीन इसम जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसले. त्यांनी तृप्ती लिंग्रस व तिच्या आईच्या अंगावरील दागिने पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघींनीही आरडाओरड केल्यानंतर तिन्ही चोरटे आपल्या हातातील साहित्य तिथेच टाकून पसार झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत तृप्ती लिंग्रस यांच्या फिर्यादीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट मधील लिंग्रस यांच्या घरात बळजबरीने घुसून रॉबरी करण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना एलसीबी सिंधुदुर्गच्या पथकाने मुंबई उपगरातून 5 डिसेंबर रोजी रात्री ताब्यात घेत कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गुन्ह्यात वापरलेली कार सुद्धा एलसीबीच्या पथकाने जप्त केली आहे.1) जगदीश श्रीराम यादव (रा. भिवंडी), 2)चनाप्पा साईबाण्णा कांबळे (रा. वागळे इस्टेट ठाणे), 3)नागेश हनुमंत माने (रा. नेरुळ) अशा तीन जणांना ताब्यात घेण्यात आले होते. आता चौथा आरोपीही अटकेत आला आहे.

टाईम्स स्पेशल

गुन्हा घडल्यापासून अवघ्या 5 दिवसांत पोलीस अधीक्षक डॉ. दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हवालदार आशिष गंगावणे, कॉन्स्टेबल कांडर , किरण देसाई, ज्ञानेश्वर तवटे आदी सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg