loader
Breaking News
Breaking News
Foto

मिशन लोकशाही अभियानात जानवळे नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी

वरवेली (गणेश किर्वे) - मिशन लोकशाही अभियानात गुहागर तालुक्यातील जानवळे नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान कामगिरी केली असून दिल्ली व मुंबई येथे अभ्यास करण्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि शिक्षण विभाग, पंचायत समिती गुहागर यांच्या विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय मिशन लोकशाही अभियान स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक आदर्श शाळा, जानवळे नं. १ येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिशन लोकशाही या अभियान अंतर्गत घेतलेल्या परीक्षेमध्ये जानवळे नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यात लक्षवेधी कामगिरी केली. या शाळेतील विद्यार्थिनी कु. शुभ्रा समीर पाटील (इयत्ता सहावी): तालुक्यात प्रथम क्रमांकाने यश संपादन केले. तर कु. प्रीत गणेश चिवेलकर: मुलांमध्ये तालुक्यात प्रथम आणि इयत्ता चौथीमध्ये चौथा क्रमांक पटकावला. या दैदिप्यमान कामगिरीमुळे, कु. शुभ्रा समीर पाटील आणि कु. प्रीत गणेश चिवेलकर यांना अनुक्रमे दिल्ली आणि मुंबई येथे अभ्यास दौऱ्यासाठी जाण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. हे गुहागर तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी मोठे यश आहे.

टाइम्स स्पेशल

यावेळी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांचेही अभिनंदन केले. याप्रसंगी विजय शिंदे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर, गणेश किर्वे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष प्रथमेश रायकर, शहर अध्यक्ष वेदांत देवळेकर, जानवळे वार्ड अध्यक्ष विजय शिंदे, मळण शाळा अध्यक्ष मंगेश धामणस्कर, विजय शिंदे, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव, शाखा अध्यक्ष सुशांत कोळंबेकर, महाराष्ट्र सैनिक विवेक जानवळकर, सर्व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून अभिनंदन केले. जानवळे नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांच्या या यशाने गावाचे आणि तालुक्याचे नाव अधिक उंचावले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg