loader
Breaking News
Breaking News
Foto

वडगाव शाळेत शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम

रायगड - जिल्हा शासकीय रुग्णालय,अलिबागच्या परिचर्या प्रशिक्षण केंद्र अलिबाग येथील ANM व GNM च्या विद्यार्थिनींचे ग्रामीण आरोग्य अनुभव शिबीर रसायनी पाताळगंगा येथील लोहोप आरोग्य उपकेंद्रात सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत आज रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,वडगाव येथे शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी,BMIS व आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. यात आरोग्य विषयक चांगल्या सवयी, घ्यावयाची काळजी तसेच किशोरवयीन मुले यांना मार्गदशन, किशोरवयीन मुलींना स्वच्छता व शारीरिक बदल तसेच घ्यावयाची दक्षता व मासिक पाळी व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाकरीता जिल्हा रुग्णालय रायगड, अलिबागच्या अधिसेविका श्रीमती गायत्री म्हात्रे व परिचर्या प्रशिक्षण केंद्र जिल्हा रुग्णालय रायगड, अलिबागच्या परिचर्या अधिकारी सारिका पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाकरिता पाठ्यनिर्देशिका धनश्री पाटील , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक सुभाष राठोड व इतर शिक्षक , विद्यार्थी ,पालक उपस्थित होते व जी.एन. एम. तृतीय वर्ष विद्यार्थिनी परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg