loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी नगर परिषद निवडणूक : प्रभाग १२ मध्ये शिवसेनेविरोधात ‘चक्रव्यूह’!

रत्नागिरी - रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन उमेदवारांना पराभूत करण्यासाठी स्वपक्षातील असंतुष्टांसह विरोधकांनी मोठा ‘चक्रव्यूह’ रचल्याची माहिती समोर आली आहे. या प्रभागात एका माजी नगरसेवकासह पहिल्यांदाच राजकारणात उतरणाऱ्या महिला उमेदवाराला पराभूत करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी अक्षरशः जंग जंग पछाडले असल्याचे समजते. पडद्यामागील राजकीय हालचालींमुळे या प्रभागाची निवडणूक अधिकच चुरशीची झाली होती. आता २१ तारखेला निकाल लागल्यानंतर नेमके किती क्रॉस व्होटिंग झाले, कोणी कुणाला दांडी मारली आणि चक्रव्यूह किती यशस्वी ठरला, याचा खुलासा होण्याची दाट शक्यता आहे. या निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg