loader
Breaking News
Breaking News
Foto

कारवांचीवाडीचा तरुण कलाकार ‘कला-टॉक्स’ मध्ये; ओमकार भातडेंच्या जिद्दीला कलारंगचे व्यासपीठ

तुषार पाचलकर (राजापूर) - रत्नागिरी जिल्ह्याच्या कलाविश्वात मान उंचावणारी आनंदाची बातमी कारवांचीवाडी येथून पुढे आली आहे. येथील स्व-शिक्षित तरुण कलाकार ओमकार भातडे याची ‘कलारंग’ या डिजिटल कला व्यासपीठावर सादर होणाऱ्या “कला-टॉक्स” या सर्जनशील मुलाखत मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. ओमकार सध्या रत्नागिरी येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेत असून घरच्या आर्थिक जबाबदाऱ्यांचा विचार करून त्याने व्यावसायिक शिक्षणाची दिशा स्वीकारली आहे. मात्र लहानपणापासून मनात रुजलेली कला हीच त्याची खरी ओळख ठरली आहे. रेषा, रंग आणि कॅनव्हास यांच्याशी असलेले नाते त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संवादादरम्यान ओमकार म्हणाला की, कुटुंबासाठी उभा राहण्याची जबाबदारी मोठी आहे, पण कला नसेल तर आयुष्य अपूर्ण वाटते. त्याच्या चित्रांमध्ये बारकाईचे निरीक्षण, भावना आणि कल्पनाशक्तीचा समतोल प्रत्ययास येतो. उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ‘कलारंग’ हे डिजिटल माध्यम असून ओमकारची जिद्द, चिकाटी आणि कलात्मक जाण पाहून त्याची कहाणी ‘कला-टॉक्स’साठी निवडण्यात आली आहे. “परिस्थितीशी झुंज देत स्वतःची वाट शोधणारे कलाकार हेच कलारंगचे खरे प्रेरणास्थान आहेत,” असे कलारंगचे संस्थापक आर्किटेक्ट अनिकेत सक्रे यांनी यावेळी सांगितले.

टाईम्स स्पेशल

या विशेष भागात ओमकारची प्रेरणा, त्याचा संघर्ष आणि भविष्यातील स्वप्ने कलारसिकांसमोर उलगडली जाणार आहेत. लवकरच हा ‘कला-टॉक्स’चा भाग कलारंगच्या इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात येणार आहे. ओमकार भातडेसह कारवांचीवाडी परिसरासाठी ही घटना अभिमानाची ठरणार असून, जिद्द आणि कलेची सांगड घालणारी ही यशोगाथा अनेक तरुणांसाठी नवी प्रेरणा ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg