loader
Breaking News
Breaking News
Foto

खंडाळ्यात भीषण आग! हार्डवेअरच्या गोडाऊनसह इको कार जळून खाक

​रत्नागिरी (प्रतिनिधी) - रत्नागिरी तालुक्यातील निवळी-जयगड मार्गावरील खंडाळा बाजारपेठेत यामिनी हार्डवेअरच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याने मोठी वित्तहानी झाली आहे. या दुर्घटनेत गोडाऊनमधील हार्डवेअरचे लाखो रुपयांचे सामान आणि एक चारचाकी इको कार पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीत हार्डवेअरचे सामान आणि वाहनाचे मिळून अंदाजे १४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जयगड पोलिसांनी दिली आहे. ​यामिनी हार्डवेअरचे मालक मोहनलाल चौधरी यांचे खंडाळा बाजारपेठेत दुकान आहे. दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या त्यांच्या घराच्या मागेच त्यांनी हार्डवेअरच्या वस्तू साठवण्यासाठी गोडाऊन उभारले होते. तेथे दुकानासाठी लागणारे सामान आणि त्यांची चारचाकी इको गाडी पार्क करून ठेवली जात होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अचानक मोहनलाल चौधरी यांना त्यांच्या गोडाऊनमधून धूर व आगीच्या ज्वाला दिसल्या. त्यांनी तत्काळ मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. मात्र, अवघ्या काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी तात्काळ धाव घेतली. परिसरातील टँकर आणि टेम्पोने पाणी पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांनीही मानवतावादी दृष्टिकोनातून आग विझवण्यासाठी पाणी उपलब्ध केले. ​आगीची माहिती मिळताच जेएसडब्ल्यू (JSW) आणि आंग्रे पोर्टच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. ​अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि ग्रामस्थांनी तब्बल दोन तासांपेक्षा अधिक काळ अथक प्रयत्न केल्यानंतर ही आग काही प्रमाणात शांत झाली आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

टाईम्स स्पेशल

​या भीषण आगीमुळे मोहनलाल चौधरी यांच्या गोडाऊनमधील हार्डवेअरचा संपूर्ण साठा आणि त्यांची चारचाकी इको कार पूर्णतः जळून खाक झाली. या दुर्घटनेत चौधरी यांचे अंदाजित १४ लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. ​आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ​याबाबत यामिनी हार्डवेअरचे मालक मोहनलाल चौधरी यांनी जयगड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. जयगड पोलीस या आगीच्या घटनेमागील नेमके कारण आणि नुकसानीचा पंचनामा करून अधिक तपास करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg