loader
Breaking News
Breaking News
Foto

शेडुंग टोल नाक्याच्या २० किमी परिघातील नागरिकांना टोल माफी द्या - आरपीआय शहरअध्यक्ष निलेश सोनावणे

पनवेल :- पनवेल ते खोपोली, खालापूर या परिसरात नागरिकांना जावे यावे लागल्यास जुना पनवेल- पुणे महामार्गावर शेडुंग टोल नाका लागतो. या टोल नाक्यावर जात येत असताना स्थानिकांना टोल भरावा लागत असल्याने नागरिकांना भुर्दंड बसतो. त्यामुळे शेडुंग टोल नाक्याच्या २० किमी परिघातील नागरिकांना टोल माफी द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पनवेल तालुक्यातील तालुक्यात फिरताना देखील शेडुंग टोल नाका येथे टोल भरावा लागणे म्हणजे आपल्याच घरात फिरताना कर देणे असे झाले आहे. पनवेल तालुक्यातील पोयंजे, नढाल, बारवई, टाकादेवी, चौक, भिंगारवाडी आदी गावात अनेकांचे नातेगोते आहेत. त्यांच्या सुखदुःखात नेहमीच यावे - जावे लागते. तसेच काही कामानिमित्त या परिसरात यावे जावे लागते. त्यामुळे या परिसरात जाता येताना शेडुंग येथे टोल भरावा लागतो. शासनाने २० किमी परिघातील नागरिकांना टोल माफीचे निर्देश दिले असताना शेडुंग टोल नाका येथे स्थानिकांकडून सक्तीने टोल वसूल केला जातो.

टाईम्स स्पेशल

सदर बाब आपण लक्षात घेता शेडुंग टोल नाक्याच्या २० किमी परिघातील नागरिकांना टोल माफी द्यावी असे लेखी आदेश टोल चालक कंपनीला द्यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रायगड जिल्हाधिकारी, पनवेल प्रांत अधिकारी यांच्याकडे निलेश सोनावणे यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg