loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रकाश कदम 'कोकण रत्न' पुरस्काराने सन्मानित

दोडामार्ग (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आडाळी गावचे सुपुत्र घाटकोपर मुंबई इथे रहाणारे, रक्षा मंत्रालय (डीजीक्यूए) नोकरीस असणारे, प्रसिद्ध निसर्ग छायाचित्रकार आणि पर्यावरण अभ्यासक प्रकाश कदम यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे कोकणरत्न सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्रदान सोहळा आज १३ डिसेंबरला संध्याकाळी ४ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान जवळ, मुंबई इथे अतिशय उत्साहात आणि अलोट गर्दीत संपन्न झाला. स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत कोकणातील निवडक व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर केल्याचे मुंबई अध्यक्ष धनंजय कुसवेकर यांनी सांगितले. तसेच अभियानाचे संस्थापक/अध्यक्ष संजय कोकरे यांच्या हस्ते प्रकाश कदम यांना मेडल आणि कोकण रत्न पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे ज्येष्ठ संपादक सचिन कळझुनकर आणि इतर मान्यवर उपस्थितीत होते. प्रकाश कदम यांना आतापर्यंत पर्यावरण भूषण, पर्यावरण मित्र, आदर्श गुणवंत कामगार पुरस्कार, उत्कृष्ट छायाचित्रकार तसेच रक्षा मंत्रालय, गृह मंत्रालय, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था तसेच अनेक विद्यापीठांकडून पुरस्कार प्राप्त झालेले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या २५ वर्षापासून प्रकाश कदम हे महाराष्ट्र आणि बाहेरील राज्यातील अनेक जंगलात जाऊन तिथे जैवविविधतेचा अभ्यास करून ती माहिती छायाचित्रांच्या प्रदर्शन माध्यमातून शाळा, विद्यालये, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवून पर्यावरण संवर्धन व सुरक्षा विषयी जागृती निर्माण करण्याचे काम सतत करत आहेत. त्यांना सामाजिक कार्याची आवड असून ते बाल अनाथ आश्रम, वृध्दाश्रम,आदिवासी आणि गरीब वस्ती इथेही मदतीसाठी जात असतात. पर्यावरणीय विषयांशी संबंधित अनेक शॉर्ट फिल्म बनविल्या असून त्या फिल्म्सना पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. अनेक दैनिक, साप्ताहिक, मासिक, वार्षिक अंकात पर्यावरणावर लिखाण प्रसिद्ध झालेले आहे. त्यांच्या या अनेक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ह्या वेळी राजेंद्र सुर्वे, सुभाष राणे, दिलीप लाड, सचिन गावडे यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रकाश कदम यांना सन्मानित करण्यात आल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg