loader
Breaking News
Breaking News
Foto

साटवलीच्या सरपंचपदी बाजी सावंत यांची बिनविरोध निवड

लांजा (वार्ताहर) :- तालुक्यातील साटवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पूर्वीच्या एकीकृत शिवसेनेचे तत्कालिन तालुकाप्रमुख दत्ताराम उर्फ बाजी सावंत यांची बिनविरोध निवड झाली असून, त्यांच्यानिमित्ताने एका ज्येष्ठ शिवसैनिकाचा सन्मान आमदार किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्याकडून करण्यात आल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. लांजा पश्चिम विभागातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साटवली ग्रामपंचायतीच्या नेतृत्वात खांदेपालट करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दत्ताराम उर्फ बाजी सावंत यांची निवड करण्यात आली आहे. आमदार किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या आदेशानुसार बाजी सावंत यांना सरपंचपदी निवडण्यात आल्याचे शिवसैनिकांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दत्ताराम सावंत हे पूर्वी एकीकृत शिवसेना पक्षाचे बरीच वर्षे तालुकाप्रमुख होते. त्यानंतर ते खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणून निवडून आले होते. आमदार राजन साळवी यांच्या काळात ते विजनवासात पडले होते. मग त्यांची सक्रियता केवळ साटवली गावापुरतोच राहिली होती. आमदार किरण सामंत यांनी त्यांना पुन्हा मोठी जबाबदारी देऊन साटवली विभागात सक्रिय केले आहे. ते कुणबी समाजाचे असल्यामुळे त्यांचा उपयोग जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे)पक्षाला होईल असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

टाईम्स स्पेशल

बाजी सावंत यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, उपतालुकाप्रमुख सुहास खामकर, माजी सभापती आदेश आंबोळकर, युवासेना तालुकाधिकारी राजू धावणे, विभागप्रमुख किरण शेरे यांनी साटवली येथे जाऊन नवीन सरपंच बाजी सावंत यांचे अभिनंदन केले. यावेळी संतोष साटले, इंदवटी सरपंच विनोद गुरव, उपसरपंच जबीन लांबे, माजी सरपंच इरम बरमारे, बुथप्रमुख प्रसाद तरळ, प्रतिष्ठित नागरिक नाना सावंत, राजू शेरे, चंद्रकांत कालकर, ग्रामपंचायत सदस्य समीक्षा नारकर. दिनेश राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg