सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील 'ट्रेल हंटर्स' ग्रुपच्या सदस्यांनी आरोग्य आणि पर्यावरण जनजागृतीसाठी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील टोप येथून थेट गोवा येथील मोरजीम बीचपर्यंत २१५ किलोमीटर अंतराची सायकल राईड यशस्वीरीत्या पूर्ण केली. गुलाबी थंडी आणि बोचरा थंडगार वारा झेलत या साहसी सायकलपटूंनी पहाटे चार वाजता टोप येथून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. टोप, कागल, गोवावेस, आजरा, गवसे, आंबोली, सावंतवाडी मार्गे त्यांनी मोरजीम बीच, गोवा असा २१५ किमीचा खडतर प्रवास अवघ्या १२ तास २० मिनिटांत पूर्ण केला. या राईडमध्ये पुणे येथून आलेल्या डॉ. रवींद्र काटकर यांनीही सहभाग घेऊन ती पूर्ण केली, हे विशेष.
गोवा फेरीत ट्रेल हंटर्स ग्रुपचे प्रमुख डॉ. प्रदीप पाटील, तसेच डॉ. मिलिंद कुंभार, डॉ. रवींद्र काटकर, प्रमोद यादव, डॉ. सुनील महापुरे, डॉ. शशिकांत कुंभार, डॉ. उमेश खताळ, डॉ. महेश थोरात, केरबा पाटील, कृष्णात पाटील, नंदकुमार साळोखे, बाजीराव मिसाळ, वीरेंद्र चौगुले, संकेत घाटगे, पवन जंगम, राहुल पाटील, सिद्धार्थ डुनुग, मधुकर माळी, लक्ष्मण कुंभार, प्रदीप निकम, संजय कुशिरे, नितीन बोभाटे, ओंकार पाटोळे, योगेश खताळ आदी सदस्य सहभागी झाले होते. या उपक्रमाबद्दल बोलताना डॉ. प्रदीप पाटील यांनी सांगितले की, "दररोज प्रत्येकाने किमान २० किमी सायकल चालविल्यास ते आरोग्यासाठी अत्यंत हितावह ठरते. सायकलिंगमुळे शरीराबरोबरच मेंदूतील नसा कार्यक्षम होतात, ज्यामुळे माणूस निरोगी राहतो. यामुळे आळस जाऊन संपूर्ण दिवस ताजातवाना राहतो आणि आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात." 'ट्रेल हंटर्स' ग्रुपतर्फे दरवर्षी आरोग्य व पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.