loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर पं. स. शिक्षण विभाग यांच्या वतीने तालुकास्तरीय "मिशन लोकशाही" परीक्षेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर पंचायत समितीचे कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या संकल्पनेतून साकारलेली व गुहागर पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथी ते पाचवी व सहावी ते सातवी या दोन गटातील शालेय विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती प्राथमिक स्तरावर माहित व्हावी यासाठी तालुका स्तरीय मिशन लोकशाही परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये केंद्रानुसार परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये गुहागर तालुक्यातील २७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून या विद्यार्थ्यांना दिल्ली व मुंबई इथे अभ्यास दौर्‍यासाठी नेण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विद्यार्थ्यांचा खर्च पंचायत समिती सेस अनुदानातून तसेच अनेकांनी दिलेल्या देणगीतून करण्यात येणार आहे. मिशन लोकशाही परीक्षेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गुहागर पंचायत समिती सभागृहामध्ये मंगळवारी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, गटशिक्षणाधिकारी रायचंद्र गळवे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी चंद्रकांत कारंडे, शामसुंदर चप्पलवार, कनिष्ठ सहाय्यक प्रथमेश देसाई, केंद्रप्रमुख परवेज चिपळूणकर, केंद्रप्रमुख महेंद्र देवळेकर, प्रभारी केंद्रप्रमुख प्रकाश जोगळे, आदर्श शिक्षक चंद्रकांत बेलेकर, कैलास शार्दुल, शिक्षक संघटना समवेत समितीचे अरविंद पालकर त्याचप्रमाणे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

या परीक्षेमध्ये इ.४ थी मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वरा राहुल नरसाळे (पालशेत मारूती मंदिर), शरयू सचिन पाते(कौंढर काळसूर गुरववाडी), श्रेया शिवाजी साळवे(आबलोली नं.१), प्रीत गणेश चिवलकर (जानवळे नं.१), स्वराज दत्तात्रय राठोड (खोडदे नं.१), भूषण बाळासाहेब लवटे(खोडदे नं.१), इयत्ता ५ वी मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये रुही महेश जोशी(कौंढर काळसूर गुरववाडी), श्रेया संदेश मांडवकर (पालपेणे नं.१), मनाली महेंद्र मूकनाक(कौंढर काळसूर गुरववाडी), आयुष नितेश फटकरे(शिर नं.१), आदेश दीपक दवंडे(पिंपर नं.२), कौस्तुभ नयन गुरव(शीर नं.२), ओवी गोंधळी(असोरे), देवेश्री निलेश पाटील(साखरी आगर नं.१), इ.६वी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शुभ्रा समीर पाटील,(जानवळे नं. १), आयुष नंदकुमार रावणग(सुरळ), श्रेयश सुभाष सनगरे(कर्दे नं २), निल संदिप वनगे(गिमवी), श्रावणी मंगेश कुळये(कर्दे नं २), प्रचिती किरण भोसले(काजुर्ली नं.२), इ.७वी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अर्णव संजय बामणे व वृषभ रामदास गिजे, श्रेया वसंत बामणे (कौंढर काळसूर गुरववाडी), वेदांत विवेक बारस्कर(कर्दे नं.२), धनश्री संदिप वाघे (कोळवली नं.१), सानवी सत्यवान राणे(काजुर्ली नं.२), कार्तिकी सुभाष सुर्वे (मढाळ नं.३) या सर्व विद्यार्थ्यांचा गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत बेलेकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg