loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडीत ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात

वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभववाडीत ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन छत्रपती शिवाजी विद्यालय नेर्ले- तिरवडे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तालुक्यातील सर्वच शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने विविध प्रतिकृती घेऊन या प्रदर्शनात सहभागी झाले होते. या प्रदेशात अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. प्राथमिक गटात प्रतिकृती मध्ये अन्मय अमित शिंदे याच्या स्मार्ट बुट या प्रतिकृतीस द्वितीय क्रमांक तर माध्यमिक गटात सिद्धेश भंडारी याच्या नेत्ररक्षक पटल या प्रतिकृतीस प्रथम क्रमांक प्राप्त झाला. निबंध स्पर्धेत प्राथमिक गटात प्रांजल धनराज हत्तुरे हिने तृतीय क्रमांक तर माध्यमिक गटात शिवानी रत्नाकर फुटक हिने प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांना एस.व्ही.भोसले, एस.ए.सबनिस, पी.पी.सावंत, पी.बी.पवार, व्ही.एस.मरळकर, एम.एस.चोरगे, वाय.आर.चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg