loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग बाजारपेठमध्ये टेम्पो-कार अपघात, वाहतूक कोंडी

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते पणजी मार्गावर दोडामार्ग वनविभाग कार्यालयसमोर दोन्ही बाजूंनी रस्ता साईड पट्टी खचली आहे. याची दुरुस्ती केली गेली नाही. यामुळे दोन वाहने पार करताना कसरत करावी लागते. जर दोन्ही बाजूंनी एकादे दुचाकी वाहन उभे केले तर आणखी गैरसोय होते. दोडामार्ग वन कार्यालयसमोर एक कार तसेच माल वाहतूक टेम्पो दरम्यान किरकोळ अपघात झाला. टेम्पोच्या टेपनी व्हीलचा भाग लागून कारचा मागील भंम्पर बाहेर आला. निखळून पडला. यामुळे दोन्ही वाहन धारकात किरकोळ वाद झाले. यामुळे वाहतूक कोंडी झाली. नंतर दोन्ही वाहने बाजुला करत तडजोड करून प्रकरण मिटवले. गोवा येथील टेम्पो माल भरुन दोडामार्गमध्ये येत होता. तर कार दोडामार्ग येथून गोवा येथे जात होती. दोडामार्ग वन विभाग कार्यालयसमोर टेम्पो आला तेव्हा एका बाजूला मोटार सायकल व इतर वाहने उभी होती. शिवाय रस्ता साईड पट्टी देखील नाही. यावेळी टेम्पो पुढे घेत असताना कडेला असलेल्या कारला टेपनी व्हीलचा भाग अडकून कारचा बंपर बाहेर आला. दोन्ही चालकात वाद झाला. दोडामार्ग आठवडा बाजार त्यात किरकोळ अपघात दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या. होमगार्ड दाखल झाले. तसेच वाहन धारक गोळा झाले. अखेर वाहने बाजुला करत प्रकरण तडजोड करून मिटवले. या नंतर वाहतूक सुरळीत झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg