loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये 'श्री स्वामी विवेकानंद हायस्कूल तिथवली'च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

​वैभववाडी (प्रतिनिधी) : येथे नुकत्याच संपन्न झालेल्या वैभववाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये 'श्री स्वामी विवेकानंद हायस्कूल, तिथवली'च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. प्रदर्शनातील 'प्रश्नमंजुषा स्पर्धेत' शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, त्यांच्या या यशाबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा तिथवलीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विज्ञान प्रदर्शनातील प्रश्नमंजुषा स्पर्धेत शाळेचे विद्यार्थी दुर्गेश हरयाण आणि मानसी हरयाण यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत प्रथम क्रमांक मिळवला. त्यांच्या या यशाची दखल घेत शिवसेना शाखा तिथवलीच्या वतीने शाळेत जाऊन गुणवंतांचा गौरव करण्यात आला. हा सत्कार समारंभ सन्मा. शाखाप्रमुख नाना जैतापकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ​याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका सचिव गुलजार काझी, शाळेचे मुख्याध्यापकमिलिंद मेस्त्री, ओमकार इस्वलकर यांच्यासह शाळेतील इतर शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, मान्यवरांनी त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg