loader
Breaking News
Breaking News
Foto

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर खेळाबरोबरच ज्ञान संपादन करा : एकनाथ नाडकर्णी

साटेली (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात जिद्द आणि चिकाटी हे गुण आत्मसात करणे गरजेचे आहे, खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे, जीवनात यश संपादन करायचे असेल तर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर खेळाबरोबरच ज्ञानही संपादन करा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष- एकनाथ नाडकर्णी यांनी दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज दोडामार्ग च्या दोन दिवसीय आयोजित शालेय क्रिडामहोत्सव कार्यक्रमात बोलताना आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नाडकर्णी हे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कसई दोडामार्ग नगर पंचायत च्या नगरसेविका तथा शिक्षण व आरोग्य सभापती - संध्या राजेश प्रसादी, सामाजिक कार्यकर्ते व पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष - संजय गवस, मोरगांव ग्रा.पं.चे सरपंच- देविदास पिरणकर, प्रशालेचे मुख्याध्यापक- संजय पाटील,जेष्ठ शिक्षक़- रमाकांत जाधव, अनिल मांगले, क्रिडा प्रमुख - ए.एल.बामणीकर उपस्थित होते. ध्वजारोहण क्रिडांगणाचे श्रीफळ वाढवून नाडकर्णी यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले, तर क्रिडा ज्योत संध्या प्रसादी यांचे हस्ते प्रज्वलीत करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक - रमाकांत जाधव यांनी, सुत्रसंचालन - जगदिश सावंत, तर आभार - ए.एच.उराडे यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg