loader
Breaking News
Breaking News
Foto

डाॅ.धनंजय रासम यांचा ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवली तालुका संघटनेच्यावतीने सत्कार

वैभववाडी (प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून शहरातील समाजसेवी व्यक्तीमत्व तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे डाॅ.धनंजय रासम यांचा ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवली तालुका संघटनेच्यावतीने सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ.धनंजय रासम वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात येथे अस्थी रोग तज्ञ म्हणून गेल्या तीन वर्षांपासून सेवेत दाखल झाले. अस्थी रुग्ण असलेल्या तसेच अपघातात हातपाय मोडलेल्या असंख्य गोरगरीब गरजू रुग्णांची आणि मनक्यांची व खुब्याची कठीणात कठिण मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना चालते फिरते केले आहे. गरजू गरीब रुग्णांसाठी चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देऊन असंख्य रुग्णांना जीवदान दिले आहे. सामाजिक बांधिलकीतून रुग्णांना चांगली सेवा देण्याचा डॉ.रासम यांचा प्रयत्न असतो. डॉ.धनंजय रासम या तरुण उद्योग मुख व्यक्तीमत्वाच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवली तालुका संघटनेच्यावतीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून कणकवली शहरातील डॉ.धनंजय रासम यांचा संघटनेच्या वतीने कार्याचा गौरव म्हणून त्यांना संघटनेचे पदाधिकारी हनिफ भाई पिरखान आणि प्रकाश माईणकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी संतोष नाईक यांनी डॉ.रासम यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा विशेष उल्लेख करुन त्यांच्या कार्याची ओळख सर्वांना करून दिली. तसेच त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

या गौरव समारंभ प्रसंगी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष- संतोष नाईक, संघटनेचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय शेळके, जिल्हा खजिनदार हनिफ भाई पिरखान, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय खानविलकर, कणकवली तालुकाध्यक्ष- मंगेश चव्हाण, तालुका सचिव- सदाशिव राणे, वैभववाडी तालुका अध्यक्ष प्रकाश माईणकर, संघटनेचे पदाधिकारी सौ.श्रावणी मदभावे, सतिश मदभावे, किर्ती आंबेरकर, मंगेश सावंत, कणकवली एस्.टी.बसस्थानकाचे सेवानिवृत्त आगार व्यवस्थापक श्री.भोसले, आनंद बाणे, महेंद्र चव्हाण, रवी माने, अक्षय शेडेकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg