loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीच्या वि.दा.सावरकर नाट्यगृहाला नाट्यगृहच राहू द्या, नाट्यरसिक जनतेच्या भावना

रत्नागिरी (डिजीटल डेस्क) - रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह हे नाट्यप्रयोगासाठी शासनातर्फे उभारण्यात आले आहे, मात्र आता या नाट्यगृहाचा उपयोग इतर क्षेत्रासाठी होत असल्याने नाटयगृह उभारण्याचा हेतू बाजूला पडत आहे की काय? असा प्रश्‍न नाटयप्रेमी जनतेतून उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपासून अनेक नाटक या ठिकाणी सादर करण्यात आली. त्यामुळे नाट्यरसिकांनी याचा पूरेपूर आनंद घेतला. नाट्यक्षेत्रातील कलाकारांनाही आता या नाट्यगृहाचा पूरेपूर लाभ मिळत आहे. त्यामुळे नाट्यगृह इतर कारणांसाठी वापरण्यात येवू नये, तसेच नाट्यगृहाला चित्रपटगृह बनवू नये, असे नाट्यरसिक जनतेतून म्हटले जात आहे. रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाने याबाबत विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे, अन्यथा नाट्यगृहामध्ये सांस्कृतिक दर्जा नसलेले उपक्रम सुरु होतील आणि नाट्यगृहाचे स्वरुप बदलून जाईल, असे नाट्यप्रेमी जनतेतून म्हटले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg