loader
Breaking News
Breaking News
Foto

सदाशेठ म्हात्रे यांच्याकडून निळवणे नं. १ शाळेला गॅस कनेक्शन व शेगडी प्रदान

खेड (दिलीप देवळेकर) - मुंबई स्थित उद्योजक सदाशेठ म्हात्रे यांच्यावतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निळवणे नं.१ या शाळेला मिशन आपुलकी अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेसाठी गॅस कनेक्शन व शेगडी तसेच रोख रुपये 5000 देणगी दिली आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत शालेय पोषण आहार शिजवण्याकरिता इंधन म्हणून लाकूडफाटा वापरला जात होता. सदाशिव म्हात्रे यांनी ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद शाळा निळवणे नं. १ या शाळेला पोषणशक्ती योजनेअंतर्गत आहार शिजवण्यासाठी मोफत गॅस कनेक्शन व शेगडी तसेच शालेय भौतिक गरजांसाठी मिशन आपुलकी अंतर्गत रोख रुपये 5000 देणगी दिली आहे. याबद्दल शाळेच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला निवृत्त सुभेदार गोपीनाथ कदम, मधुकर जाधव, मुख्याध्यापक मोहन सोनवणे, उपशिक्षक नितीन साळुंखे, पदवीधर शिक्षक अनंत मोरे व इतर मित्रमंडळी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg