loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्गात महापरिनिर्वाण दिनी 'संविधान कार्यशाळे'द्वारे अभिनव आदरांजली

दोडामार्ग (प्रतिनिधी) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोडामार्ग येथील 'समाज जागृती मंचा'च्या वतीने पारंपारिक पद्धतीला छेद देत एका अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. केवळ पुष्पार्पण न करता विचारांचे पूजन व्हावे, या उद्देशाने 'संविधान समजून घेताना' या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा कार्यक्रम राणी लक्ष्मीबाई हळबे कॉलेजमध्ये संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कराड (जि. सातारा) येथील प्रसिद्ध संविधान अभ्यासक प्रा. अझरुद्दीन पटेल उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना संविधानाची क्लिष्ट भाषा अत्यंत सोप्या शब्दांत उलगडून दाखवली. संविधानातील प्रस्ताविका , नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि नीति निर्देशक तत्त्वे यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. "बाबासाहेबांनी दिलेले संविधान हे केवळ कायदेशीर पुस्तक नसून ते आपले जीवनशास्त्र आहे. जोपर्यंत आपण ते समजून घेत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने प्रबुद्ध नागरिक होऊ शकत नाही," असा मोलाचा विचार प्रा. पटेल यांनी मांडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक जाधव यांनी केले. सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, "सध्या संविधानावर होणारे आघात पाहता, सामान्य नागरिकांनी सजग होणे गरजेचे आहे. आपले अधिकार आणि कर्तव्ये समजल्याशिवाय आपण संविधानाचे रक्षण करू शकणार नाही."

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर शांताराम जाधव यांनी केले, तर आभार संतोष कदम यांनी मानले. या कार्यशाळेसाठी दोडामार्ग तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पोलीस पाटील, महिला भगिनी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सर्वांनी संविधानाचे वाचन आणि आचरण करण्याचा संकल्प यावेळी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg