loader
Breaking News
Breaking News
Foto

नेमळेत रानगव्याचा मृत्यू : सर्पदंशाचा संशय

सावंतवाडी : नेमळे मलेश्वर मंदिरलगत शेतात रानगव्याचा मृत्यू झाला. सदरचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नेमळे येथे जंगल परिसरालगत तेथील शेतकऱ्यांना रानगवा मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर मळगाव वनपाल विजय पांचाळ हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदरचा रानगवा मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर याबाबतची माहिती वरिष्ठांना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानंतर सावंतवाडी वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्यासह वनरक्षक सुनील गडदे, मळगांव वनरक्षक मोहन गोटुकडे, वन विभागाच्या जलद कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर यांच्यासह त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी मृत गव्याचे शवविच्छेदन करून मृतदेह वनविभागाच्या ताब्यात दिला. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात दफन करण्यात आले. सदर गव्याचा मृत्यू सर्पदंशाने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg