loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचा उद्या मालवणात शुभारंभ

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने मालवण चिवला बीच येथे 13 व 14 डिसेंबर रोजी 15 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. आठ राज्यातील सुमारे 1500 स्पर्धक या दोन दिवशीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. अशी माहिती संघटना अध्यक्ष श्रीकृष्ण (दिपक) परब व महाराष्ट्र जलतरण संघटना सचिव राजेंद्र पालकर यांनी दिली आहे. दोन्ही दिवशी सकाळी सहा वाजता स्पर्धाना सुरवात होणार आहेत. तर दुपारी एक वाजल्यापासून चिवला बीच येथेच बक्षीस वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. दरम्यान स्पर्धेचे उदघाटन शनिवार 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणार आहे. रात्री वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली यांचा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गेली अनेक वर्ष ही स्पर्धा होत असून स्थानिकांसह अनेक सामाजिक संस्था यांचा उत्स्फूर्त सहभाग यात नेहमी असतो. मालवणच्या पर्यटन वाढीत या स्पर्धेचे योगदानही मोठे आहे. या सागरी जलतरण स्पर्धेमुळे येथील पर्यटनाला चालना मिळाली व स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला. स्थानिकांकडून ही विविध ठिकाणाहून आलेल्या स्पर्धकाचे व त्यांच्या कुटुंबियांचे चांगले आदरातिथ्य केले जाते. दिव्यांगं जलतरणपटूना विशेष सहाय्य व प्रोत्साहन दिले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी संघटनेने खास सवलत दरात प्रवेशिका उपलब्ध केल्या आहेत. २००९ पासून सागरी जलतरण स्पर्धेचे मालवण चिवला बीच येथे आयोजन होत आहे. राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा ही संपूर्ण भारतातील विशेष अशी स्पर्धा असून या स्पर्धेत ६ वयापासून ते ७५ वयाहून अधिक स्पर्धक भाग घेत असलेली एकमेव स्पर्धा आहे. यावर्षी तर 4 वर्ष पासून 95 वर्ष वय पर्यत स्पर्धक सहभागी होणार आहेत. तीन पिढ्या मुलगा, वडील, आजोबा एकत्र होणारी ही भारतातील एकमेव स्पर्धा असून या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे गेली तीन वर्ष पासून दिव्यांग जलतरणपटू साठी एका वेगळ्या गटाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला मेडल, सहभाग प्रमाणपत्र व टी-शर्ट कॅप देण्यात येणार आहे तसेच ग्रुपमध्ये विजेत्याना रोख बक्षीस, अन्य भेट वस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. एकूण आठ लाख रक्कमेची पारितोषिक, भेटवस्तू असणार आहेत. आठ राज्य मधील स्पर्धक आणि महाराष्ट्रातील बहुतांश सर्व जिल्हे यातील सुमारे 1500 स्पर्धक यांनी ऑनलाईन नाव नोंदणी पुर्ण केली आहे.

टाइम्स स्पेशल

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्य जलतरण संघटने तर्फे 10 किलोमीटर स्पर्धा व 1 किलोमीटर, 2 किलोमीटर फिन्स स्विमिंग स्पर्धा आयोजन होणार आहे. ही स्पर्धा पुर्ण झाल्या नंतर ऑल इंडिया फिन्स स्विमिंग चॅम्पियनशिप होणार आहे. त्या दिवशीचा पारितोषिक वितरण चिवला येथेच होईल होणार. स्पर्धच्या दुसऱ्या दिवशी 14 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जलतरण संघटना राज्यस्तरीय स्पर्धा 500 मिटर एक किलोमीटर, दोन किलोमीटर, तीन किलोमीटर, पाच किलोमीटर या सर्व ग्रुप ची स्पर्धा होणार. त्याचे पारितोषिक वितरण होणार. आंतरराष्ट्रीय स्पर्धेप्रमाणे यावर्षीपासून या स्पर्धेत ऑटोमेटीक टायमिंग सिस्टीम टच पॅड वापरली जाणार आहे. स्पर्धकांकडे रिस्ट वॉच असेल. तो स्कॅन होईल. वेळ नंबर त्यावर कळेल. एकूणच अधिक नवे बदल करून एक दर्जेदार असे या स्पर्धेचे स्वरूप असणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg